वन विभागाच्या सकारात्मकतेवर गेज परिवर्तन अवलंबून
By admin | Published: February 24, 2016 01:38 AM2016-02-24T01:38:16+5:302016-02-24T01:38:16+5:30
वन विभागाच्या देहरादून येथील चमूने केली रेल्वे मार्गाची पाहणी.
राम देशपांडे / अकोला
दक्षिण मध्यचा मीटरगेज रेल्वेमार्ग मेळघाटातील अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्पातून जातो. गेल्या अनेक वर्षांंपासून प्रलंबित असलेला गेज परिवर्तनाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून वन विभागाच्या केंद्रीय अधिकार्यांनी संरक्षित क्षेत्रातून जाणार्या रेल्वे मार्गाची डिसेंबर-२0१५ मध्ये पाहणी केली होती. वन विभागाचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात असला तरी, पाहणीदरम्यान वनाधिकार्यांनी दर्शविलेल्या सकारात्मकतेवर गेज परिवर्तन अवलंबून असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकार्यांनी ह्यलोकमतह्णला दिली.
विशेष बाब म्हणजे, या पाहणीचा अहवाल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे याआधीच सादर झाला असल्यास, गुरुवारी संसदेत सादर होणार्या रेल्वे अर्थसंकल्पात ह्यहृदयस्थानाह्णची ही धडधड सर्व देशवासीयांना एकायला मिळणार, हे निश्चित.
अकोला ते खंडवा या दक्षिण मध्य रेल्वेच्या गेज परिवर्तनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांंपासून प्रलंबित असला तरी, अकोला ते आकोट, दरम्यान या प्रकल्पास अंशत: चालना मिळाली आहे; मात्र आकोटच्या पुढे वानरोड ते तुकईखेडदरम्यान हा रेल्वेमार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून जातो. गेज परिवर्तनानंतर या मार्गावर गाड्यांचे आवागमन वाढणार हे निश्चित असल्याने, त्याचा फटका रेल्वेमार्गावर वावरणार्या वन्य श्वापदाना बसू शकतो. वन विभागाच्या कायद्यात ही बाब मुळीच बसत नसल्याने, वन विभागाने अतिसंरक्षित क्षेत्रातून जाणार्या रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनास परवानगी नाकारली.
रेल्वे प्रशासनासाठी कळीचा ठरत असलेल्या या बाबीची सखोल माहिती व्हावी म्हणून प्रारंभी स्थानिक रेल्वे अधिकार्यांना सोबत स्वत: ट्रॉलीवर स्वर होऊन खासदार संजय धोत्रे यांनी वन विभागातून जाणार्या रेल्वे मार्गाची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी केंद्रीय वन विभागास पुन्हा नव्याने पाहणी करण्याची विनंती केली.
खासदारांच्या या विनंतीस मान देऊन, डिसेंबर २0१५ मध्ये देहरादून येथील वनाधिकारी त्यांच्या चमूसह वन विभागात दाखल झाले होते. या पाहणीदरम्यान वनाधिकर्यांनी दक्षिण मध्य रेल्वे अधिकार्यांसोबत अनेक सकारात्मक मुद्यांवर चर्चा केली. हिरखेड ते तुकईथड या वनपरिक्षेत्राबाहेरून जाणार्या पर्यायी मार्गाचा अवलंब न करता, आहे त्याच मार्गाचे गेज परिवर्तन कशा पद्धतीने केले जाऊ शकते, या विविध बाबींवर त्यांनी सकारात्मकता दर्शविली.