तुरीचे अनुदान ९९०० शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; १२ हजार शेतकरी प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 06:46 PM2018-12-01T18:46:21+5:302018-12-01T18:46:36+5:30
जिल्ह्यातील २२ हजार ३६८ शेतकºयांपैकी ९,९०० शेतकºयांच्या खात्यात शुक्रवारी तुरीचे अनुदान जमा करण्यात आले.
अकोला: ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीसाठी ‘आॅनलाइन’ नोंदणी केली; मात्र तूर खरेदी करण्यात आली नाही, अशा शेतकºयांसाठी प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदानाची रक्कम शासनामार्फत मंजूर करण्यात आली असून, जिल्ह्यातील २२ हजार ३६८ शेतकºयांपैकी ९,९०० शेतकºयांच्या खात्यात शुक्रवारी तुरीचे अनुदान जमा करण्यात आले. उर्वरित १२,४६८ तूर उत्पादक शेतकरी अद्याप अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
आधारभूत किंमत योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीत गत १५ मेपर्यंत जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, पातूर, तेल्हारा, पारस, बार्शीटाकळी, अकोट व मूर्तिजापूर इत्यादी आठ केंद्रांवर तूर खरेदी करण्यात आली. नाफेडमार्फत तूर खरेदी बंद करण्यात आल्याने, तूर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी करूनही जिल्ह्यातील २२,३६८ शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली नाही. या पृष्ठभूमीवर तूर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी केलेल्या; मात्र तूर खरेदी करण्यात आली नाही, अशा तूर उत्पादक शेतकºयांसाठी शासनामार्फत गत जून महिन्यात प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आले. शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात असतानाच, १५ दिवसांपूर्वी शासनामार्फत तूर अनुदानाची रक्कम मंजूर करण्यात आली. त्यानुसार अनुदानास पात्र जिल्ह्यातील २२,३६८ शेतकºयांपैकी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत १३,९०० शेतकºयांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ३० नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली. त्यामध्ये पहिल्या दिवशी (३० नोव्हेंबर) ९,९०० शेतकºयांच्या खात्यात तूर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली असून, उर्वरित ४,४९ शेतकºयांच्या खात्यात लवकरच अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. तर विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अकोला शाखा अंतर्गत ८,४६८ शेतकºयांना अनुदान वाटप सुरू होण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. त्यामुळे १२,४६८ तूर उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.
८,४६८ शेतकºयांच्या याद्या ‘व्हीसीएम’कडे!
आॅनलाइन नोंदणी केली; मात्र तूर खरेदी करण्यात आली नाही अशा अकोट व मूर्तिजापूर तालुक्यातील ८,४६८ शेतकºयांच्या याद्या विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अकोला शाखेमार्फत विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या मुख्य कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या. याद्यांना मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित शेतकºयांच्या खात्यात अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.