आगारातील पार्किंग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:20 AM2021-03-23T04:20:26+5:302021-03-23T04:20:26+5:30
अकोला : शहरातील मध्यवर्तीय बसस्थानकामध्ये मागील काही महिन्यांपासून पार्किंगची व्यवस्था बंद असल्याने मोटारसायकलधारक त्रस्त झाले आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने ...
अकोला : शहरातील मध्यवर्तीय बसस्थानकामध्ये मागील काही महिन्यांपासून पार्किंगची व्यवस्था बंद असल्याने मोटारसायकलधारक त्रस्त झाले आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने नाईलाजाने इतरत्र मोटारसायकल उभी करावी लागत आहे. त्यात पोलिसांच्या टोविंग पथकाकडून कारवाई होईल का? अशीही चिंता लागली आहे.
---------------------------------------------------------
रस्त्यांवरील गर्दी कमी होईना!
अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जिल्हा प्रशासनाकडून सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान सर्व व्यवसायास सूट देण्यात आली आहे. नागरिकांनी गरज असल्यास बाहेर पडण्याची आवश्यकता असताना अनेक जण अनावश्यक बाहेर फिरतांना दिसत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील गर्दी काही कमी होण्याचे नाव घेत नाही.
---------------------------------------------------------
शासकीय कार्यालयात थर्मल स्कॅनिंग गरजेचे
अकोला : शहरासह ग्रामीण भागातून शहरातील शासकीय कार्यालयात येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयांमध्ये सॅनिटायझर मशीनसोबत थर्मल स्कॅनिंग गरजेचे बनले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेतेसाठी सर्व शासकीय कार्यालयात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची थर्मल स्कॅनिंग करणे आवश्यक आहे.