‘नरेगा’ च्या कामांमध्ये यंत्रणांची उदासीनता
By admin | Published: February 10, 2016 02:21 AM2016-02-10T02:21:13+5:302016-02-10T02:21:13+5:30
अकोला जिल्ह्यात केवळ १५९ कामे सुरू.
संतोष येलकर / अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) जिल्ह्यात विविध यंत्रणांमार्फत सध्या केवळ १५९ कामे सुरू आहेत. ग्रामपंचायतींच्या तुलनेत यंत्रणांच्या कामांचे प्रमाण कमी असल्याने ह्यनरेगाह्णच्या कामांमध्ये यंत्रणांची उदासीनता असल्याची बाब समोर येत आहे. ह्यनरेगाह्ण अंतर्गत सिंचन विहिरी, शेततळी, शेतरस्ते, अंतर्गत रस्ते, ढाळीचे बांध, बंधारे, विहिरींचे पुनर्भरण, वृक्ष लागवड व इतर प्रकारची कामे केली जातात. या कामांच्या माध्यमातून गावागावांत मजुरांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करून दिली जातात. मागणी येताच मजुरांना कामे उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनामार्फत वारंवार संबंधित विभागाला दिल्या जातात. ह्यनरेगाह्णअंतर्गत ग्रामपंचायत स्तर आणि विविध यंत्रणांकडून कामे केली जातात. ह्यनरेगाह्णअंतर्गत जिल्ह्यात सध्या सुरू असलेली कामे आणि त्यावर काम करणार्या मजुरांची उपस्थिती याबाबत स्थिती बघता, जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ३७९ कामे सुरू असून, त्यावर १४ हजार ८७१ मजूर काम करीत आहेत, तर कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग आदी यंत्रणांमार्फत जिल्ह्यात केवळ १५९ कामे सुरू असून, या कामांवर ३ हजार ४१९ मजूर उपस्थित आहेत. ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेली कामे आणि त्यावरील मजूर उपस्थितीच्या तुलनेत विविध विभागांमार्फत (यंत्रणा) सुरू असलेल्या कामांचे व कामांवरील मजूर उपस्थितीचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यात ह्यनरेगाह्णच्या कामांमध्ये संबंधित यंत्रणांची उदासीनता असल्याची बाब समोर येत आहे.