ग्रामीण नागरिकांत लसीकरणाची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:19 AM2021-05-09T04:19:09+5:302021-05-09T04:19:09+5:30

अनंत वानखडे बाळापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. लसीकरण केंद्रातील गर्दी ...

Depression of vaccination among rural citizens | ग्रामीण नागरिकांत लसीकरणाची उदासीनता

ग्रामीण नागरिकांत लसीकरणाची उदासीनता

Next

अनंत वानखडे

बाळापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. लसीकरण केंद्रातील गर्दी टाळण्यासाठी गावात शिबिर आयोजित करण्यात येत आहेत, परंतु नागरिकांचा प्रतिसाद दिसून येत नाही. ग्रामीण भागात जनजागृतीच्या अभावी नागरिकांची लसीकरणाकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना, शासनाने लसीकरण मोहिमेला वेग दिला आहे. लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी टप्प्यात लसीकरण केले जात आहेत. शहरात लसीकरण करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या असताना, ग्रामीण भागात मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. तालुक्यातील पाच लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. गावागावात आरोग्य विभागाची यंत्रणा दाखल होत आहे. लसीकरणासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे, परंतु दिवसभर या केंद्राकडे लसीकरणासाठी कुणी भटकत नसल्याचे चित्र आहे. बहुतांश नागरिकांत लसीकरण संदर्भात भ्रम निर्माण झाले असून, नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाल्याचे चित्र आहे. अफवांना बळी पडल्याने लसीकरण संदर्भात सकारात्मक परिणाम दिसून आले नाहीत. लसीकरण मोहीम गावात राबविण्यासाठी गावात समिती स्थापन करण्यात आली आहे. सरपंच ते तलाठीपर्यंत लोकप्रतिनिधी, कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे, परंतु ग्रामपंचायतमध्ये लसीकरण मोहीम सुरू असताना, समितीचे सदस्य उपस्थित राहत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, लसीकरणासाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

---------------------

‘लसीकरण केंद्रात ब्लड प्रेशर, डायबिटीज तपासणी करा!’

लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण करताना नागरिकांची अन्य आजारांविषयी तपासणी करण्यात येत नाहीत. ब्लड प्रेशर, डायबिटीज तपासणी केली पाहिजे, हाय ब्लड प्रेशर असणारे नागरिक लसीकरणासाठी येताच, डोक्यात चुकीचा भ्रम असल्याने ब्लड प्रेशर वाढत आहे. घामाघूम झाले असता, त्यांना घरी परत पाठविले जात आहे. डोक्यातील भ्रम काढण्यासाठी त्यांचे प्राथमिक स्तरावरील तपासण्या करण्याची गरज आहे. गावात जुन्या पिढीतील नागरिक अशिक्षित आहेत.

-----------------------------------

तालुक्यात ९,९८० जणांनी घेतला डोस

तालुक्यात लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर, नागरिकांमध्ये भ्रम निर्माण झाल्याने लसीकरण मोहीम थंडावली. सद्यस्थितीत तालुक्यातील पाच लसीकरण केंद्रांमध्ये लस देणे सुरू असून, आतापर्यंत तालुक्यातील ८,९५५ जणांनी पहिला डोस घेतला, तर १,०२५ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला.

Web Title: Depression of vaccination among rural citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.