वंचित बहुजन आघाडीची नवी कार्यकारिणी जाहीर; अकाेल्यातून प्रा. पुंडकरांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:21 AM2021-03-09T04:21:44+5:302021-03-09T04:21:44+5:30
अकाेला वंचित बहुजन आघाडीच्या नवीन राज्य कार्यकारिणीची घाेषणा अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी साेमवारी केली. यात अकाेल्यातून प्रा. डाॅ. ...
अकाेला
वंचित बहुजन आघाडीच्या नवीन राज्य कार्यकारिणीची घाेषणा अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी साेमवारी केली. यात अकाेल्यातून प्रा. डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली असून, अकाेल्यातील प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पाताेेडे यांच्यासह अनेकांना नवीन कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेले नाही.
सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारिप-बमंसचे नेते आंबेडकर यांनी राज्यात वंचित बहुजन आघाडी जाहीर केली हाेती. याचा काँग्रेस-राष्ट्रवादीसह इतरही पक्षांनी चांगलाच धसका घेतला हाेता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी स्वबळावर मैदानात उतरली. मात्र यश मिळाले नाही. दरम्यान नंतरच्या काळात भारिपच्या प्रदेश, विभागीय, जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विलीनीकरणाची घाेषणा करण्यात आली . दरम्यान ८ मार्च राेजी नवीन राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, यापूर्वीची कार्यकारीणी संपुष्टात आली आहे. सर्व विभागीय कार्यकारिणीचे अध्यक्ष हे राज्य कार्यकारिणीचे सचिव म्हणून कामकाज सांभाळणार असून, सात विभागीय कार्यकारिणींची घाेषणा लवकरच हाेणार आहे. त्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, काेकण व मुंबई िविभागाचा समावेश आहे. तीनही ज्येष्ठ उपाध्यक्षांकडे प्रशिक्षणाची जबाबदारी राहणार आहे. अन्य उपाध्यक्षांना अनुक्रमे कृषी धाेरण, आदिवासी संघटन, वडार समाज संघटन, निवडणूक व्यवस्था व कार्यालय प्रशासन, तृतीयपंथीयांचे संघटन, समन्वयक प्रवक्ता-सभासद नाेंदणी-संघटन विस्तार व ओबीसी संघटन अशी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.
अशी आहे नवीन कार्यकारिणी
उपाध्यक्ष:- नवीन कार्यकारिणीत एकूण ११ उपाध्यक्षांच्या नावांची घाेषणा करण्यात आली असून, यात ज्येष्ठ उपाध्यक्ष म्हणून ॲड. विजय माेरे, डाॅ. अरुण सावंत व ॲड. धनराज वंजारी यांचा समावेश आहे. तसेच अन्य उपाध्यक्षपदी प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, किसन चव्हाण, अनिल जाधव, गाेविंद दळवी, दिशा पिंकी शेख, सिद्धार्थ माेकळे, साेमनाथ साळुंखे व नागाेराव पांचाळ यांचा समावेश आहे.
प्रवक्ते:- फारुख अहमद व ॲड. प्रियदर्शी तेलंग हे प्रवक्ते पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
यांनाही संधी
सर्व आघाड्यांचे पदाधिकारी हे प्रतिनिधी हे सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत. यात युवा आघाडीचे अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा ठाकूर व महासचिव अरुंधती सिरसाट यांचा समावेश आहे.
अशीही राहणार जबाबदारी................................