वंचित बहुजन महिला आघाडीची आज महिला मुक्ती परिषद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:15 AM2020-12-25T04:15:25+5:302020-12-25T04:15:25+5:30
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ नियमांचे पालन करून वंचित बहुजन महिला आघाडी शहर व जिल्हा शाखेच्या वतीने ...
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ नियमांचे पालन करून वंचित बहुजन महिला आघाडी शहर व जिल्हा शाखेच्या वतीने शुक्रवार, २५ डिसेंबर रोजी महिला मुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने २५ डिसेंबर रोजी महिला मुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात येते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ नियमांचे पालन करून यंदा वंचित बहुजन महिला आघाडीच्या अकोला शहर शाखेच्या वतीने दुपारी १ वाजता रामदासपेठस्थित क्रीडा संकुलाजवळ तसेच जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थान परिसरात महिला मुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तालुकास्तरावरही महिला मुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले. २५ डिसेंबर महिला मुक्ती दिन जाहीर करण्यात यावा, या मागणीसह विविध ठराव महिला मुक्ती परिषदेत पारित करण्यात येणार असून, परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती सिरसाट व डाॅ. प्रीती शेगाेकार उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष वंदना वासनिक, जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, शोभा शेळके, पुष्पा इंगळे, प्रतिभा अवचार, किरण बोराखडे, प्रा. मंतोष मोहोळ, सुवर्णा जाधव, सुनीता गजघाटे, प्रीती भगत, प्रतिभा नागदेवते, पार्वती लहाने, संगीता खंडारे, मंदा वाकोडे, सुरेखा सावदेकर उपस्थित होत्या.