अकोट तालुक्यात आरक्षणाचा वंचित, शिवसेनाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:17 AM2021-03-24T04:17:14+5:302021-03-24T04:17:14+5:30
अकोटः अकोट तालुक्यातील जिल्हा परिषदच्या दोन व पंचायत समितीचे चार जागा आरक्षणामुळे रिक्त झाल्या. नव्या आरक्षणामुळे पंचायत समिती स्तरावर ...
अकोटः अकोट तालुक्यातील जिल्हा परिषदच्या दोन व पंचायत समितीचे चार जागा आरक्षणामुळे रिक्त झाल्या. नव्या आरक्षणामुळे पंचायत समिती स्तरावर वंचित व शिवसेनेला प्रत्येकी दोन जागी फटका बसला आहे. वंचितला आपला उपसभापती गमवावा लागला. पंचायत समितीच्या चारही जागा सर्वसाधारण झाल्याने महिला- पुरुषाची उमेदवारीसाठी वाढणारी गर्दी राजकीय पक्षाची डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे ठरणारी आहे.
अकोट पंचायत समितीच्या नव्या आरक्षणामुळे अकोलखेड सर्कल वंचितचे नीलेश राधेशाम झाडे हे निवडणून आले होते. ते उपसभापती पदी विराजमान झाले होते. तर पिंप्री सर्कल मधुन
राधा प्रल्हाद काळे विजयी झाले होते. शिवसेनेचे ज्ञानेश्वर पुरुषोत्तम दहिभात मुंडगाव सर्कल मधुन तर हरीदिनी अशोक वाघोडे रौंदळा सर्कल मधुन ओबीसी जागेवर विजयी झाले होते.आरक्षणामुळे चारही जागा रिक्त झाल्या आहेत. सध्या नव्या आरक्षणामुळे पिंप्री खु व रौंदळा सर्कल हे सर्वसाधारण स्त्री या जागा करीता राखीव झाले. तर अकोलखेड, मुंडगाव हे दोन सर्कल सर्वसाधारण करीता राखीव झाले आहेत. यापुवीँ चारही सर्कल ओबीसी करीता राखीव असल्याने पक्षाकडे मोजक्या कार्यकर्ते उमेदवारी मागितली होती. पंरतु आता सर्वसाधारण असल्याने पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे पंचायत समिती मधील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी वंचीत ला या निवडणूक कसरत करावी लागणार आहे. शिवाय शिवसेना,काँग्रेस, राँका यांना पंचायत समितीवर बहुमत वाढविण्यासाठी संधी मिळाली आहे. भाजपा यांना पंचायत समितीमध्ये स्थान प्राप्त करण्यासाठी कार्यकर्ते समजुत काढत सोईचे राजकारण करण्याकरीता इतरासोबत जुळवून घ्यावे लागणार आहे. सध्यातरी या सर्कल मध्ये जि.प. सदस्यांचा कितपत फायदा होतो. शिवाय पंचायत समितीत सत्ता आल्यानंतरचे काळात कोणती कामे केली या मुद्द्यावर ग्रामीण परिसर ढवळून निघणार आहे.