बँक खात्याद्वारे लाच घेणाऱ्या उपकार्यकारी अभियंता रूपाली खोब्रागडे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:37 PM2019-02-06T12:37:14+5:302019-02-06T12:37:19+5:30
अकोला : बँक खात्याद्वारे सहा हजारांची लाच स्वीकारणाºया महावितरण कंपनीच्या अकोला ग्रामीण विभागातील उपकार्यकारी अभियंता रूपाली खोब्रागडे यांना मंगळवारी तातडीने निलंबित करण्यात आले.
अकोला : बँक खात्याद्वारे सहा हजारांची लाच स्वीकारणाºया महावितरण कंपनीच्या अकोला ग्रामीण विभागातील उपकार्यकारी अभियंता रूपाली खोब्रागडे यांना मंगळवारी तातडीने निलंबित करण्यात आले. एका महिन्याच्या आत दोन लाचखोरीच्या घटना उजेडात आल्याने महावितरण विभाग हादरले आहे.
सुशिक्षित अभियंता कंत्राटदार असलेल्या राहुल केकन यांचे कामाचे सात लाखांचे बिल मंजूर करून देण्यासाठी उपकार्यकारी अभियंता खोब्रागडे यांनी सहा हजारांची लाच मागितली होती. सोमवारी व्यवहार ठरल्यानंतर कंत्राटदारास अभियंता खोब्रागडे यांनी स्टेट बँकेचे खासगी खाते क्रमांक दिले. दरम्यान, कंत्राटदाराने ही बाब वरिष्ठांच्या कानावर टाकून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे तोंडी तक्रार केली. त्यानंतर मंगळवारी खात्यात सहा हजारांची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर घडलेला प्रकार ग्रामीणचे कार्यकारी अभियंता गजेंद्र गाडेकर यांना सांगितला. गाडेकर यांनी याप्रकरणी सविस्तर अहवाल तातडीने अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांना सादर केला. कछोट यांनी या प्रकरणाची दखल गंभीरतेने घेत रूपाली खोब्रागडे यांना निलंबित केले. खोब्रागडे बुलडाणा येथेही निलंबित झाल्या होत्या. त्यांनी येथे कार्यकारी अभियंता यांच्यावर हात उगारल्याप्रकरणी कारवाई झाली होती, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. अभियंता म्हणविणाºया पदाच्या अधिकाºयांनी थेट बँक खात्यात लाच स्वीकारण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी.