जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देशमुख दाम्पत्यामुळे वाढली चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:52 AM2021-02-20T04:52:14+5:302021-02-20T04:52:14+5:30
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वामनराव देशमुख हे ई-पगारदार नोकरांच्या पतसंस्था नागरी सहकारी बँक ग्रामीण व नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगर ...
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वामनराव देशमुख हे ई-पगारदार नोकरांच्या पतसंस्था नागरी सहकारी बँक ग्रामीण व नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्थ आणि अ ते ड व्यतिरिक्त इतर सभासद संचालक या पदासाठी तर छायाताई देशमुख महिला प्रतिनिधी संचालक पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. सहकार क्षेत्रात स्व. अण्णसाहेब देशमुखांपासून देशमुख दाम्पत्यांचे मोठे योगदान आहे. मागील अनेक वर्षांपासून महानंदचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्षपद या माध्यमातून वामनराव देशमुख शेतकरी हितासाठी काम करीत आहेत. या कार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून छायाताई देशमुखदेखील शिक्षणासह ग्रामीण भागातील महिलांचे बचत गट तयार करून समाजकार्यात सक्रिय आहेत. समाजसेवेचा वसा घेतलेले देशमुख दाम्पत्य जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे देशमुख दाम्पत्य निवडणुकीत इतिहास घडविणर असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात रंगू लागली आहे.