अनधिकृत धार्मिक स्थळे पाडणार !

By Admin | Published: August 13, 2016 01:48 AM2016-08-13T01:48:03+5:302016-08-13T01:48:03+5:30

अकोला जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू : उपविभागीय अधिका-यांनी घेतली बैठक.

To destroy unauthorized religious places! | अनधिकृत धार्मिक स्थळे पाडणार !

अनधिकृत धार्मिक स्थळे पाडणार !

googlenewsNext

अकोला, दि. १२ : जिल्हय़ातील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यात येणार आहेत. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात सन २00९ नंतर उभारण्यात आलेली जिल्हय़ातील नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तयारी सुरू करण्यात आली आहे.
रस्त्यावरील व रहदारीला अडथळा ठरणारी सरकारी जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हय़ातील महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती घेण्यात आली आहे. जिल्हय़ातील एकूण अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई करण्याच्या पहिल्या टप्प्यात २९ सप्टेंबर २00९ नंतर उभारण्यात आलेली जिल्हय़ातील नगरपालिका आणि ग्रामीण भागातील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यात येणार आहेत. यासंदर्भात गत ४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याच्या कारवाईचे नियोजन करण्यात आले. पोलीस विभागाच्या मदतीने अनधिकृत धार्मिक स्थळे निष्काशित करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी या बैठकीत दिले. जिल्हय़ातील नगरपालिका व ग्रामीण क्षेत्रातील अनकिृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात अकोला व बाश्रीटाकळी तालुक्यातील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महसूल प्रशासनामार्फत तयारी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान श्रावण महिन्यात येणारे धार्मिक उत्सव व सण लक्षात घेता या कारवाईबाबत प्रशासन अतिशय सावधगिरीने पावले उचलत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा भंगही होता कामा नये, याची दक्षताही घ्यावी लागत आहे.

Web Title: To destroy unauthorized religious places!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.