सौंदळा परिसरात पिकांची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:14 AM2021-07-21T04:14:44+5:302021-07-21T04:14:44+5:30

--------------------------- चिडीमारांवर कारवाईची मागणी अकोट : शहरात चिडीमारांचा हैदोस वाढला असून, मुलींच्या छेडखानीचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांनी बंदोबस्त करावा, ...

Destruction of crops in Soundala area | सौंदळा परिसरात पिकांची नासधूस

सौंदळा परिसरात पिकांची नासधूस

Next

---------------------------

चिडीमारांवर कारवाईची मागणी

अकोट : शहरात चिडीमारांचा हैदोस वाढला असून, मुलींच्या छेडखानीचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहे.

--------------------

घाणीच्या साम्राज्याने डासांचा प्रादुर्भाव

बाळापूर : शहरात अस्वच्छतेमुळे अनेक भागात मागील काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक ठिकाणी नाल्या नियमित स्वच्छता होत नसल्याने तुंबल्या आहेत़

-------------------

वॉकला जाणाऱ्यांची रस्त्यावर वाढली गर्दी

तेल्हारा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आली असताना सकाळी आणि सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता बळावली आहे.

---------------

नियोजित वेळेत बसेस सोडण्याची मागणी

चोहोट्टाबाजार : बसफेरी वेळेवर सोडण्यात येत नसल्याने नागरिकांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊननंतर ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू झाल्या परंतु त्यांच्या वेळा निश्चित केलेल्या नाहीत.

--------------------

बंद एटीएम ठरताहेत डोकेदुखी

वाडेगाव : राष्ट्रीयीकृत बँकांनी ग्राहकांच्या सोईसाठी एटीएम मशीन लावल्या; पण ही सेवा सध्या डोकेदुखी ठरत आहे. बहुतांश एटीएम बंद असल्याने ग्राहकांची भटकंती होत आहे. त्यामुळे तात्काळ एटीएम केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.

-------------------

झुकलेल्या खांबांमुळे अपघाताची भीती

पातूर : तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी उभारलेले वीजखांब पाऊस आणि वादळवाऱ्यामुळे झुकले आहेत. एखादवेळी खांब कोसळल्यास अपघाताची भीती असल्याने हे खांब सरळ करण्याची मागणी होत आहे.

-------------------

पाणंद रस्ते झाले चिखलमय

बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील शिवारात पाणंद रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली; परंतु अपुऱ्या निधीमुळे या रस्त्यांची कामे सुरू होऊ शकली नाहीत. आता पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत.

-------------------

वन्यप्राण्यांचा हैदोस; सोयाबीनचे नुकसान

म्हातोडी : खरीप हंगामातील सोयाबीन पीक चांगलेच बहरले आहे; परंतु आता वन्यप्राणी या पिकांवर ताव मारत आहेत. हरणांचा कळप धुडगूस घालून सोयाबीन, मूग, उडीद ही पिके फस्त करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

-----------------

जलस्रोतांची पातळी वाढली

मूर्तिजापूर : या वर्षी उन्हाळ्यात बहुतांश जलस्रोतांच्या पातळीत लक्षणीय घट झाली होती; मात्र गत आठवड्यात दमदार पाऊस पडल्याने तालुक्यातील प्रकल्पांच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. कूपनलिका, विहिरींची पातळीही वाढली आहे.

------------------------

बीएसएनएलची कनेक्टिव्हिटी खंडित

पातूर : गत काही दिवसांपासून भारत संचार निगम लिमिटेडच्या इंटरनेटची कनेक्टिव्हिटी वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे आपले सरकार केंद्रांतील कामे खोळंबून ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Destruction of crops in Soundala area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.