भाजपच्या काळात लाेकशाहीचे अवमुल्यन - फाैजीया खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 19:06 IST2020-12-07T19:03:26+5:302020-12-07T19:06:21+5:30
Faujiya Khan News भाजप सरकारच्या काळात लाेकशाहीचे अवमुल्यन झाले आहे असा आराेप राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार फाैजीया खान यांनी केला

भाजपच्या काळात लाेकशाहीचे अवमुल्यन - फाैजीया खान
अकाेला : केंद्र सरकारने देशात हुकुमशाहीची स्थिती निर्माण केली आहे. कुठल्याही प्रश्नावर विराेधाचा आवाज दाबला जात आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर हे सरकार सपशेल अपयशी ठरेल असुन या भाजप सरकारच्या काळात लाेकशाहीचे अवमुल्यन झाले आहे, असा आराेप राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार फाैजीया खान यांनी केला.
स्थानिक विश्राम भवन येथे आयाेजीत पत्रकार परिषदेत त्या बाेलत हाेत्या. त्या म्हणाल्या केली शेतकऱ्याच्या प्रश्नावर या सरकारने देशाची काेंडी केली आहे. सर्व देशात कृषी कायद्यांना विराेध आहे; मात्र हे सरकार हा विराेध ऐकण्यास तयार नाही. दिल्लीत आंदाेलन करत असलेल्या शेतकऱ्यांवर दडपण आणण्यासाठी अनेक मार्ग त्यांनी अवलंबले; मात्र आता सर्व देश शेतकऱ्यांच्या पाठीशी असून राष्ट्रवादी काॅंग्रेसही शेतकरी आंदाेलनाला सक्रीय पाठींबा देत आहे असे त्यांनी सांगीतले. यावेळी आमदार अमाेल मिटकरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, डाॅ आशा मिरगे, राजु मुलचंदाणी आदी उपस्िसथत हाेते.