पातूरच्या लेणी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा

By admin | Published: May 26, 2014 01:05 AM2014-05-26T01:05:31+5:302014-05-26T01:13:29+5:30

भारतीय लेणी संवर्धन समितीची मागणी.

Develop Tarur caves as tourist spots | पातूरच्या लेणी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा

पातूरच्या लेणी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा

Next

अकोला : पातूरच्या बुद्ध लेणी ही पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावी, तसेच तेथील दुरवस्था थांबून तिचे संवर्धन करा अशी मागणी भारतीय लेणी संवर्धन समिती (ब्लिस) महाराष्ट्रच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनानुसार, पातूरच्या लेण्या सातवाहन कालिन आहे. इ.स. पूर्व दुसरे शतक ते इ.स. तिसरे शतक अशा ४00 वर्षापर्यंत तिचा निर्माण कालावधी आहे. या लेण्यांचे खोदकाम वाकाटक राजा हरिषेण व त्याचा प्रधानमंत्री वराहदेव यांनी केले आहे. या लेण्यांचा शोध इ.स. १७३0 मध्ये ब्रिटीश पुरातत्व तज्ज्ञ एडमंड लायन आणि राबर्ट गिल यांनी लावला. राबर्ट गिल यांनी अजिंठा लेण्यांचाही शोध लावला. लेण्यांमध्ये बुद्ध मूर्ती होती तसेच पाली भाषेत दोन शिलालेख होते. तसेच नांदखेडजवळील डोंगरावरील तीन तोंडाचे टाके व भंडारज गावाजवळील सात तोंडाचे टाके येथे बुद्ध विहार होते, असे या दोघांच्या अहवालात नमूद आहे. त्यांचा अहवाल ब्रिट्रीश लायब्ररी ऑफ लंडन येथे उपलब्ध आहे. त्यानंतर १९८१ मध्ये आलेला कुझेन्स हेन्री अभ्यासक पातूर येथे आला होता. हेन्री यालाही पातूरच्या लेण्यांबाबत वरील अहवालाची सत्यता आढळून आली.

Web Title: Develop Tarur caves as tourist spots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.