पर्यटनस्थळांचा विकास रखडला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:20 AM2021-05-27T04:20:35+5:302021-05-27T04:20:35+5:30
अकोला : विदर्भातील शैक्षणिक व मेडिकल हब म्हणून जिल्हा नावारूपास आला आहे. सातपुड्याची हिरवीगार किमया, धनदाट वनश्रीचा गालिचा, खळखळणारे ...
अकोला : विदर्भातील शैक्षणिक व मेडिकल हब म्हणून जिल्हा नावारूपास आला आहे. सातपुड्याची हिरवीगार किमया, धनदाट वनश्रीचा गालिचा, खळखळणारे झरे, जलाशय, वनस्पतीची मुबलकता जिल्ह्याचे वैभव आहे. असे असताना येथील पर्यटनस्थळांचा विकास रखडला आहे.
होम क्वाॅरण्टीन रुग्णांचे फिरणे सुरूच
अकोला : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केला. होम क्वाॅरण्टीन असलेले रुग्ण बाहेर फिरत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. होम क्वाॅरण्टीन करण्यात आलेल्या अनेक रुग्णांनी नियम न पाळता मुक्तपणे फिरणे सुरूच ठेवल्याने अन्य नागरिकांना बाधित केल्याचे बोलले जात आहे.
नुकसानीची पाहणी करण्याची मागणी
अकोला : तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली असली तरी प्रशासनाचा सर्व्हे झाला नाही त्यामुळे नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
भाजी बाजारात उलाढाल निम्म्यावर
अकोला : कडक निर्बंधांमुळे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद आहे. त्यामुळे भाजीपाला शेतात पडून आहे. याचा परिणाम भाजी बाजारात दिसून येत असून, बाजाराची उलाढाल निम्म्यावर आली आहे. दररोज १०० क्विंटलच्या जवळपास आवक होत आहे.