क्रीडा स्पर्धांमुळे विकास पर्वाला गती - संजय धोत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 02:10 PM2018-12-24T14:10:13+5:302018-12-24T14:10:40+5:30
अकोला: देशातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा भाजप भाजयुमो यांनी आयोजित करून नावीन्यपूर्ण कार्य केले. यासोबतच समाजातील सर्व क्षेत्रांचा गौरव केला. सामाजिक, आर्थिक, भौगोलिक समतोल साधण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री चषक स्पर्धेने विकास पर्वाला गती दिल्याचे प्रतिपादन खासदार संजय धोत्रे यांनी केले.
अकोला: देशातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा भाजप भाजयुमो यांनी आयोजित करून नावीन्यपूर्ण कार्य केले. यासोबतच समाजातील सर्व क्षेत्रांचा गौरव केला. सामाजिक, आर्थिक, भौगोलिक समतोल साधण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री चषक स्पर्धेने विकास पर्वाला गती दिल्याचे प्रतिपादन खासदार संजय धोत्रे यांनी केले.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री चषक अंतर्गत आयुष्यमान क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोवर्धन शर्मा होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार रणधीर सावरकर, किशोर मांगटे पाटील, विजय अग्रवाल, वैशाली शेळके, पवन पाडिया डॉ. अभय जैन, सुधीर रांदड, डॉ. योगेश साहू, सुमनताई गावंडे, गीतांजली शेगोकार, हिरा कृपलानी, डॉ. संजय शर्मा, बाळकृष्ण नेरकर, अनुप गोसावी, सिद्धार्थ शर्मा, सारिका जयस्वाल, विजय परमार, डॉ. युवराज देशमुख, अजय शर्मा, राहुल देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
स्पर्धेत १५८ पुरुष क्रिकेट संघ व २ महिला संघांनी सहभाग घेतला होता. पुरुष गटातील अंतिम सामना एम.बी. स्पोर्ट व अकोला -११ संघात झाला. दोन्ही संघांना पारितोषिक, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवांकित करण्यात आले. यावेळी राजूभाई पटेल, राकेश रावल, मुनकीरभाई, गब्बर शर्मा, केतल बोहाटे यांचा खासदार धोत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हरिभाऊ काळे, उमेश गुजर, अदिराज गोडले, अभिजित कडू, श्याम विंचनकर, अजय शर्मा, हरीश काळे, तुषार भिरड, अनिता चौधरी, वर्षा गावंडे, रमण पाटील, धनंजय धबाले, संतोष पांडे, हरीश अमानकर, प्रशांत अवचार, सागर शेगोकार, हरीश काळे, जान्हवी डोंगरे, नंदा पाटील, रंजना विंचनकर, अर्चना शर्मा, नीलेश निनोरे, अक्षय गंगाखेडकर, हेमंत सरदेशपांडे, बबलू पळसपगार, वसंता मानकर, राजेंद्र गिरी उपस्थित होते.