पिंपळखुटा येथे ग्रामसचिवाअभावी विकासकामे खोळंबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:14 AM2021-07-01T04:14:44+5:302021-07-01T04:14:44+5:30

यावेळी ग्रामसचिव यांच्या बदलीसंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. परंतु गटविकास अधिकारी यांनी या निवेदनाला केराची टोपली ...

Development work in Pimpalkhuta without village secretary | पिंपळखुटा येथे ग्रामसचिवाअभावी विकासकामे खोळंबली!

पिंपळखुटा येथे ग्रामसचिवाअभावी विकासकामे खोळंबली!

Next

यावेळी ग्रामसचिव यांच्या बदलीसंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

परंतु गटविकास अधिकारी यांनी या निवेदनाला केराची टोपली दाखविली. ग्रामसचिव यांच्या गैरहजेरीचा फटका नुकताच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी उल्हास मोकळकर, कनिष्ठ अभियंता विठ्ठल शिंदे यांना बसला.

पिंपळखुटा येथील व्यायामशाळा तपासणीसाठी हे अधिकारी आले असता, त्यांना ग्रामपंचायतचे रेकॉर्ड प्राप्त होऊ शकले नाही. त्यामुळे व्यायामशाळा तपासणी अर्धवटच राहिली. प्रत्यक्ष बांधकामाची पाहणी केली असता, या बांधकामामध्ये अनियमितता झाल्याचे दिसून आले. यामध्ये येथील वीट बांधकाम हे पूर्णपणे पडलेले अवस्थेत आढळून आले. कॉलम व बिम यांची स्थिती अत्यंत निकृष्ट दर्जाची आढळून आली. त्यामुळे सदर बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा अहवाल यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिला. यावेळी सुभाष वाहोकार, आरिफ खान, संदीप माडोकर, विजय वानखडे यांच्यासह काही ग्रामस्थ उपस्थित होते.

व्यायामशाळेच्या झालेल्या बांधकामात अनियमितता झाली असून, सचिवाने रेकॉर्ड प्राप्त न केल्यामुळे या चौकशीमध्ये काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आम्ही सचिवाच्या बदलीची मागणी केली. परंतु गटविकास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.

-अलका सुभाष वाहोकार, सरपंच, पिंपळखुटा

Web Title: Development work in Pimpalkhuta without village secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.