धारगड यात्रेसाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:05 AM2017-07-31T02:05:28+5:302017-07-31T02:05:48+5:30

dhaaragada-yaataraesaathai-parasaasana-sajaja | धारगड यात्रेसाठी प्रशासन सज्ज

धारगड यात्रेसाठी प्रशासन सज्ज

googlenewsNext
ठळक मुद्दे६ व ७ आॅगस्टला यात्रेचे आयोजनअकोट वन्य जीव विभागाने केले नियमावलीचे पत्रक जारी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : श्रावण महिन्यातील तिसºया सोमवारी ६ व ७ आॅगस्टला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात धारगड येथे महादेवाची भव्य यात्रा भरणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने अकोट वन्य जीव विभागाने नियमावलीचे पत्रक जारी केले आहे. त्यामध्ये यात्रेच्या दोन दिवस सुलई नाल्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच नशेचे पदार्थ व शस्त्र आढळल्यास जप्तीसह प्रचलित नियमांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे कळविले आहे.
सदर धारगड मंदिर हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात येत असल्याने यात्रेला येणाºया शिवभक्तांनी नियम व सूचनांचे पालन करून यात्रा शांततेत साजरी करावी, असे आवाहन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्य जीव विभागाचे उपवनसंरक्षक लाकरा यांनी केले आहे. वाहनांद्वारे खटकाली तपासणी नाक्याकडून ६ आॅगस्ट रोजी सकाळी ६ वाजतपासून ते ७ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत भाविकांना प्रवेश दिला जाईल. ७ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत खटकाली नाका येथून बाहेर निघणे भाविकांना बंधनकारक आहे. ६ व ७ आॅगस्ट या दोन दिवसांव्यतिरिक्त इतर दिवशी धारगड मंदिरावर प्रवेश प्रतिबंधित आहे. या दोन्ही दिवशी पर्यटकांना सुलई नाल्यावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, धारगड यात्रेसंदर्भात २५ जुलै रोजी वन विभागातर्फे धारगड सेवा समितीची बैठक पार पडली. धारगडच्या रस्ता दुरुस्ती करण्यात यावा, अशी मागणी सेवा समितीचे सुरेश अग्रवाल व इतरांनी केली आहे.

श्रावण महिन्यात प्रवेशबंदी नसावी!
श्रीक्षेत्र धारगड हे हजारो शिवभक्तांचे पुरातन श्रद्धास्थान आहे. या क्षेत्राला शासनाने ‘क’ तीर्थक्षेत्राचा दर्जासुद्धा दिला आहे. पुरातन काळापासून या ठिकाणी शिवभक्त व कावडधारी हे धारगडच्या गुफेतील महादेवाला जलाभिषेक करण्याकरिता जातात. दरम्यान, हा परिसर व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित गाभा क्षेत्रात गेल्याने विविध प्रतिबंध आली आहेत; परंतु शासन निर्देशानुसार तीर्थक्षेत्रावर दर्शनाकरिता भक्तांना प्रवेशबंदी नाही. अशा स्थितीत निदान श्रावण महिन्यात तरी धारगड येथे दर्शनाकरिता जाणाºया शिवभक्तांना प्रवेशबंदी नसावी, अशी अपेक्षा शिवभक्तांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: dhaaragada-yaataraesaathai-parasaasana-sajaja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.