धाबा गाव बनले गर्दीचे हॉटस्पॉट केंद्र !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:19 AM2021-05-18T04:19:47+5:302021-05-18T04:19:47+5:30
ज्या प्रमुख गावांशी बँकिंग,आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी परिसरातील अनेक गावांचा दयनंदिनी संपर्क येत असल्याने ...
ज्या प्रमुख गावांशी बँकिंग,आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी परिसरातील अनेक गावांचा दयनंदिनी संपर्क येत असल्याने तेथे नियमांचे पालन होत नाही. व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडे देखरेख करिता मनुष्यबळ नसल्याचे यावरून दिसून येते. बार्शीटाकळी पोलीस,महसूल विभागाकडून दुर्लक्षित झालेल्या धाबा येथे १७ मे रोजी दुपारी अकोला पोलिसांच्या पेट्रोलिंग पथकाने धाबा येथील मुख्य चौकात फेरफटका मारून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केल्याचे समजते. ही दुकाने अत्यावश्यक सेवेत मोडत नसतानाही दुपारी सुरू होती. सदरची कारवाई पोलीस गस्ती पथकाच्या महिला पीएसआय ढोरे व पथकांनी केली. गंभीर बाब म्हणजे अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दवाखाने, मेडिकल, किराणा,भाजीपाला आदी ठिकाणी गर्दी होत असल्याचे दिसून येते. यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. धाबा येथे खासगी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा बँक, स्टेट बँक शाखा आदींसह अनेक सुविधा असल्यामुळे येथे अनेक गावाचा संपर्क येतो. त्यामुळे ही गर्दी वाढत असून. पोलीस विभागाने लॉकडाऊन काळात येथे नियमित कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. आणि आरोग्य विभागाने येथील बँक परिसर व खासगी दवाखान्याच्या ठिकाणी येणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याची सुविधा करावी. अशी मागणी होत आहे.
फोटो:
धाबा येथे मुख्य चौकात असणाऱ्या अत्यावश्यक सुविधा पुरविणाऱ्यांनी शासनाच्या कडक निर्बंधांचे पालन करावे. नागरिकांनी शारीरिक अंतर ठेवून नेहमी मास्कचा वापर करावा. विनाकारण फिरू नये, गर्दी करू नये. ठरवून दिलेल्या वेळेनंतर दुकानदारांनी आपली दुकाने उघडी ठेवावी.
-महेंद्र बोचरे, ग्रामसेवक धाबा