सत्तेसाठी धनगर समाजाने संघटित व्हावे -अंजली आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:02 PM2019-03-01T13:02:26+5:302019-03-01T13:03:32+5:30

अकोला: महाराष्ट्रातच नव्हे, तर जिल्ह्यात धनगर समाज बहुसंख्य असूनसुद्धा प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी आरक्षण, सत्तेपासून धनगर समाजाला वंचित ठेवले आहे. धनगर समाजाने आता जागरूक आणि संघटित झाले पाहिजे, असे मत प्रा. अंजली आंबेडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.

Dhangar community should be organized for power - Anjali Ambedkar | सत्तेसाठी धनगर समाजाने संघटित व्हावे -अंजली आंबेडकर

सत्तेसाठी धनगर समाजाने संघटित व्हावे -अंजली आंबेडकर

Next

अकोला: महाराष्ट्रातच नव्हे, तर जिल्ह्यात धनगर समाज बहुसंख्य असूनसुद्धा प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी आरक्षण, सत्तेपासून धनगर समाजाला वंचित ठेवले आहे. धनगर समाजाने आता जागरूक आणि संघटित झाले पाहिजे, असे मत प्रा. अंजली आंबेडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.
धनगर समाज संघटनेच्यावतीने आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित मेळाव्याच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन विकास आघाडीचे राज्य नेते माजी आमदार हरिदास भदे होते.
प्रमुख अतिथी म्हणून लातूर लोकसभेचे उमेदवार राम गारकर, आमदार बळीराम सिरस्कार, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा सिरसाट, नाशिकचे विनायकराव काळदाते, बळीराम चिकटे, अ‍ॅड. संतोष रहाटे, वसंतराव मुरळ, दिनकरराव पातोंड, नारायणराव ढवळे गुरुजी, श्रीकृष्ण जुमडे, रमेश उभे गुरुजी, देवानंद नवलकार, रमेश पाली, बंडूभाऊ भदे, वसंतराव भदे, गजानन दोड, जि. प. सभापती देवका पातोंड, जि. प. सदस्य गोपाल कोल्हे, बाळापूर पं. स. सभापती मंगला तितूर, लीला गावंडे, पुष्पा गुलवाडे, उषा मुरळ, दीपा भदे व उज्ज्वला जुमडे उपस्थित होते.
प्रा. अंजली आंबेडकर म्हणाल्या, सत्तेपासून वंचित असलेल्या बहुजन समाजाला सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचण्याची उत्तम संधी आहे. बहुजन समाजाला सत्ता मिळाली पाहिजे, यासाठीच अ‍ॅड. आंबेडकरांनी वंचित बहुजन विकास आघाडीची मोट बांधली आहे. सध्या राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून धनगर समाजाने वादळ निर्माण केले आहे. हे वादळ लोकसभेपर्यंत पोहोचले पाहिजे, असे यावेळी सांगितले.
माजी आ. हरिदास भदे यांनी ज्यांना आरक्षणाची गरज नव्हती, त्यांना भाजप सरकारने आरक्षण दिले आणि धनगर समाज अनेक वर्षांपासून आरक्षण मागत असूनही आरक्षण मिळत नाही. प्रस्थापित व सत्ताधाºयांना आमची केवळ मते हवी आहेत, हे आता धनगर समाजाने लक्षात घेऊन आपले धोरण ठरविण्याची वेळ आली असल्याचे मत व्यक्त केले. त्यावेळी आमदार बळीराम सिरस्कार यांनीसुद्धा बहुजन समाजाने संघटित होऊन आपली ताकद दाखवावी, असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन दिनकर नागे यांनी केले. आभार मोहन रोकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज करणकार, अभिजित नवलकार, अमोल भदे, गजानन वसतकार, श्रीकांत चिकटे, संतोष कात्रे, सचिन बचे, चंदू बोरसे, संदीप जुमडे, बंडू बोळे, प्रज्योत नागे व विजय पुंडे यांनी प्रयत्न केले.
 

 

Web Title: Dhangar community should be organized for power - Anjali Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.