ओबीसी संघर्ष समितीचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 05:08 PM2018-04-11T17:08:01+5:302018-04-11T17:08:01+5:30

अकोला : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माळी, ओबीसी संघर्ष समितीच्यावतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार, ११ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

Dharna agitation for various demands of OBC struggle committee | ओबीसी संघर्ष समितीचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन

ओबीसी संघर्ष समितीचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देसमितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यां मार्फत  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. सुधाकरराव गणगणे, महादेवराव हुरपडे, पुष्पा गुलवाडे यांच्यासह शेकडो सहभागी झाले होते. 

अकोला : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माळी, ओबीसी संघर्ष समितीच्यावतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार, ११ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

यावेळी समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यां मार्फत  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये महात्मा पुâले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा, ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी, ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ५२ टक्के आरक्षण लागू करावे, उच्च शिक्षणात १०० टक्के शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, ३ रे शेड्युल लागू व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने वेंâद्राकडे शिफारस करावी, शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, ओबीसीकरिता स्वतंत्र मंत्रालय सुरु करावे, नॉन क्रिमीलेअरची मर्यादा ८ लाख रुपये करावी, एसटी,एनटी, व्हीजे प्रमाणे ओबीसींची शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.   

सुधाकरराव गणगणे, महादेवराव हुरपडे, पुष्पा गुलवाडे, सुमन भालदाणे, अ‍ॅड. संतोष राहाटे, श्रीकांत ढगेकर, रमेश हिवाळे, अरविंद घाटोळ, सुरेश धोटे, विजय शर्मा, अ‍ॅड. सुरेश ढाकोलकर, सौरभ चौधरी, प्रमोद ढोकणे, प्रा. संतोष हुशे, श्रीराम पालकर, उमेश मसने, राहुल सरदार, सतिष चोपडे, गोपाल गाडगे यांच्यासह शेकडो सहभागी झाले होते. 

Web Title: Dharna agitation for various demands of OBC struggle committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.