शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By Atul.jaiswal | Published: January 18, 2024 07:53 PM2024-01-18T19:53:35+5:302024-01-18T19:54:10+5:30

शेतकरी संघटनेच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार, १८ जानेवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.

Dharna in front of collector office for various demands of farmers in Akola | शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

अकोला : सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा या प्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार, १८ जानेवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.

राज्यातील शेतकऱ्यांवर अत्यंत बिकट प्रसंग आलेला आहे. एकीकडे शेती व्यवसायावर दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट सारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत तर दुसरीकडे सरकार निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा, वायदे बंदी, बेसुमार आयती करून शेतीमालाचे भाव पाडत आहे. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत परंतू या समस्या सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न होत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अविनाश नाकट,सुरेश जोगळे, विलास ताथोड, धनंजय मिश्रा, डॉ. निलेश पाटील, विजय लोडम, विनोद मोहोकार, विजय देशमुख, मनोज तायडे, शंकरराव कवर, रामचंद्र तायडे यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

या आहेत प्रमुख मागण्या

सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी
शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा.
सक्तीची कर्जवसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी.
शेतीसाठी पूर्णवेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा.
वन्य प्राण्यांकडून होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावेत.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी.
पीक विम्याचा योग्य लाभ देणारी योजना आमलात आणावी.

Web Title: Dharna in front of collector office for various demands of farmers in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.