ढोलाची भजन स्पर्धा ३२ वर्षांपासून अविरत

By admin | Published: January 15, 2016 01:57 AM2016-01-15T01:57:58+5:302016-01-15T01:57:58+5:30

विदर्भ-मराठवाड्यातून येतात स्पर्धक; निमित्त झोलेबाबा यात्रा महोत्सवाचे.

Dholak hymn competition has remained unchanged for 32 years | ढोलाची भजन स्पर्धा ३२ वर्षांपासून अविरत

ढोलाची भजन स्पर्धा ३२ वर्षांपासून अविरत

Next

साहेबराव राठोड/ मंगरुळपीर (वाशिम): वाशिम जिल्हय़ातील ङ्म्री क्षेत्र चिखली येथील संत झोलेबाबा विदर्भासह मराठवाड्यात प्रसिद्ध आहेत. दरवर्षी येथे आयोजित यात्रा महोत्सवासाठी भाविकांची गर्दी असते. या यात्रेत चालीवर ढोलाच्या भजन स्पध्रेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा ३२ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती, ती आजही अविरत सुरू आहे. मंगरूळपीर तालुक्यातील ङ्म्रीक्षेत्र चिखली येथील संत झोलेबाबा यांचा ५१ वा भव्य यात्रा महोत्सव सुरू झाला आहे. याहीवर्षी १८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता चालीवर ढोलाच्या भजनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा व्यवस्थापक तुळशिराम हरणे, मारोती किसन चौधरी, रामदास राऊत यांच्यासह विश्‍वस्तांच्या मार्गदर्शनाखाली ३२ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या नियम व अटींवर घेण्यात येत आहे.

Web Title: Dholak hymn competition has remained unchanged for 32 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.