वेशभूषा स्पर्धेत बच्चे कंपनीची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:32 AM2021-02-18T04:32:20+5:302021-02-18T04:32:20+5:30
अकोला: सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने पोळा चाैकात घेण्यात आलेल्या बाल शिवाजी आणि बाल जिजाऊ वेशभूषा स्पर्धेत बच्चे कंपनीने उत्स्फूर्त ...
अकोला: सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने पोळा चाैकात घेण्यात आलेल्या बाल शिवाजी आणि बाल जिजाऊ वेशभूषा स्पर्धेत बच्चे कंपनीने उत्स्फूर्त सहभाग घेतला. तब्बल ५४ स्पर्धकांनी या स्पर्धेत वेशभूषा सादर केली.
रेशीम उद्योगाबाबत परिसंवाद
अकोला: स्थानिक शिवाजी महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभाग, भारतीय विज्ञान परिषद कोल कथा व अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन याबाबत परिसंवाद घेण्यात आला. यामध्ये डाॅ. मोहन राठोड, डाॅ. पी.एस. मांगळे, डाॅ. अतुल बोडखे, डाॅ. रामेश्वर भिसे आदींनी मार्गदर्शन केले.
सेवालाल महाराजांना अभिवादन
अकोला: महानगरपालिकेच्या डाॅ. आंबेडकर सहभागृहात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी समान्य प्रशासन विभागाचे प्रमुख गिरीश जाधव, विठ्ठल देवकते, किशोर सोनटक्के, अशोक सिरसाट, गजानन सांगळे, संजय चव्हाण, राजेश कोंडाने आदी उपस्थित होते.
नाफेडतर्फे हरभरा खरेदी सुुरू
अकोला: नाफेडच्यावतीने हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात त्यासाठी नऊ केंद्र तयार करण्यात आले आहे. यापूर्वी नाफेडने तूर खरेदी सुरु केली होती. तसेच ज्वारी खरेदीचा ही निर्णय घेतला होता.
पालक सचिवांनी घेतला आढावा
अकोला: जिल्ह्याचे पालक सचिव साैरभ विजय यांनी जिल्ह्यातील काेरोना स्थितीचा व्हीसीद्वारे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जि.प.चे सीईओ, मनपाचे वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
ऑनलाईन वर्ग सुरु ठेवा-विजुक्टा
अकोला: कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आले. त्यामुळे ऑनलाईन पूर्ववत सुरु ठेवण्याची मागणी विजुक्टाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष डी.एस.राठोड, पंकज वाकोडे, श्रीराम पालकर, संतोष अहिर, प्रविण ढोणे आदी उपस्थित होते.
बालशिवाजी वेशभूषा स्पर्धेत सृजन बळी प्रथम
अकोला: सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने पोळा चाैकात घेण्यात आलेल्या बाल शिवाजी आणि बाल जिजाऊ वेशभूषा स्पर्धेत सृजन किशोर बळी याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याला मान्यवरांच्या हस्ते रोख २५०० रुपये, सन्मानपत्र देऊन गाैरविण्यात आले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश देशमुख, कृष्णा अंधार, पंकज जायले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.