‘हीरकमहोत्सवी’ अभियान स्वायत्त संस्थांनी गुंडाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:53 PM2020-03-23T12:53:04+5:302020-03-23T12:53:36+5:30
स्वच्छता व सौंदर्यीकरणावर विशेष भर देण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
अकोला : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत घनकचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी नगर विकास विभागाने १ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत राज्यात ‘हीरकमहोत्सवी अभियान’ राबविण्याचे निर्देश दिले होते. या कालावधीत घनकचºयाचे ओला व सुका असे वर्गीकरण करण्यासोबतच शहर सौंदर्यीकरणासाठी विविध उपाय सुचविले होते. या अभियानकडे नागरी स्वायत्त संस्थांनी पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे.
१ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव साजरा केला जाईल. या निमित्ताने स्वच्छ, सुंदर व हरित महाराष्ट्राची संकल्पना साकारण्यासाठी १ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत महापालिका क्षेत्रात ‘हीरकमहोत्सवी नागरी महाराष्ट्र स्वच्छता अभियान’ राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या अभियानात घनकचºयासोबतच बांधकाम आणि पाडकाम कचºयाचीही विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. ३० एप्रिलपर्यंत राबविल्या जाणाºया अभियानात रस्त्यांची दुरुस्ती करण्यासह स्वच्छता व सौंदर्यीकरणावर विशेष भर देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. कचरा टाक ण्याच्या ठिकाणी सौंदर्यीकरण करणे, महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे, शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपायकरणे, अतिक्रमणाची समस्या दूर करण्यासाठी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याची सूचना आहे. साफसफाईच्या कामासाठी नागरी स्वायत्त संस्थांकडे पुरेशा प्रमाणात कर्मचाऱ्यांचे संख्याबळ उपलब्ध आहे.