खाद्यपदार्थांत भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:24 AM2021-08-18T04:24:53+5:302021-08-18T04:24:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : आराेग्याशी थेट निगडित असलेल्या अन्नपदार्थांमध्ये होत असलेली भेसळ रोखण्यासाठी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून कारवायांचे प्रमाण अकाेला ...

Didn't food adulterants spill poison? | खाद्यपदार्थांत भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना?

खाद्यपदार्थांत भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : आराेग्याशी थेट निगडित असलेल्या अन्नपदार्थांमध्ये होत असलेली भेसळ रोखण्यासाठी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून कारवायांचे प्रमाण अकाेला एफडीएचे चांगले आहे. जिल्हाभर गत दाेन वर्षात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाया करीत तब्बल ४२२ अन्न नमुने घेतले असून, ते तपासणीसाठी प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यावरून आपल्या खाद्यपदार्थांत भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना? हे नागरिकांनी स्वत:च तपासून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

देशभरात ५ ऑगस्ट २००६ पासून अन्नसुरक्षा आणि मानके कायदा लागू करण्यात आला. त्यातील कलम ५० अन्वये विक्री केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा योग्य नसल्यास पाच लाख, कमी दर्जाच्या अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री केल्यास पाच लाख आणि खोटी जाहिरात दिल्यास दहा लाखांपर्यंत दंड होऊ शकतो; मात्र या विभागाकडे मुळातच मनुष्यबळ अगदीच कमी असल्याने अन्नपदार्थ नमुने तपासण्याचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. त्यामुळे भेसळखोरांचे फावत असल्याचे दिसून येत आहे. मात्र अकाेला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गत दाेन वर्षात ७०० दुकानांपैकी तब्बल ४२२ ठिकाणी नमुने घेतले असून, तपासणीसाठी पाठविले आहेत.

भेसळ किती?

वर्ष/महिना घेतलेले नमुनेभेसळ

२०२० २०३

जानेवारी २७

फेब्रुवारी २६

मार्च २९

एप्रिल २९

मे २८

जून ३१

जुलै २६

ऑगस्ट २३

खरेदी करताना घ्या काळजी

श्रावण महिन्यापासून महत्त्वाच्या सणासुदींना सुरुवात होते. यादरम्यान तेल, दूध दुग्धजन्य पदार्थ, पीठ, साखर, तूप यांसारख्या खाद्यपदार्थांच्या विक्रीत अचानक वाढ होते. ही संधी हेरून काहीजण खाद्यपदार्थांत भेसळ करतात. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोनाकाळात एक लाखांचा दंड

जिल्ह्यात कार्यरत अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून कोरोनाकाळात २०२० मध्ये २०४ आणि २०२१ मध्ये आतापर्यंत २१९ असे एकूण ४२२ खाद्यपदार्थ नमुने तपासण्यात आले. त्यातील २३ नमुने कमी दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून संबंधिताना लाखो रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

सणासुदीत वाढते तपासणीचा वेग

सणासुदीच्या काळात हाॅटेल्समध्ये मिळणाऱ्या विविध स्वरूपातील आयत्या खाद्यपदार्थांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होण्याचा प्रकारही वाढीस लागतो. अकाेला जिल्ह्यात अन्नसुरक्षा अधिकारी कार्यरत असून, खाद्यपदार्थ नमुने तपासणी नियमित सुरू असते. दंडात्मक कारवाई व परवाना रद्दची कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग करीत आहे.

- रावसाहेब वाकडे

अन्नसुरक्षा अधिकारी, अकाेला

Web Title: Didn't food adulterants spill poison?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.