वाडेगावच्या मतदार याद्यांच्या संख्येत तफावत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:19 AM2020-12-06T04:19:19+5:302020-12-06T04:19:19+5:30
निवडणूक कार्यक्रमाची रूपरेषा निवडणूक विभागामार्फत निश्चित केली जात आहे. सदर प्रकरणात वाडेगावमध्ये मतदारांच्या संख्येनुसार निवडणूक विभागाकडून प्रभाग रचना करण्यात ...
निवडणूक कार्यक्रमाची रूपरेषा निवडणूक विभागामार्फत निश्चित केली जात आहे. सदर प्रकरणात वाडेगावमध्ये मतदारांच्या संख्येनुसार निवडणूक विभागाकडून प्रभाग रचना करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेवर वाडेगाव येथील पं स सदस्या रूपाली अनंता काळे यांनी तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रार अर्जानुसार प्राप्त झालेल्या प्रभाग याद्यांनुसार काही प्रभागांच्या मतदार संख्येमध्ये दिडीचा तर काही मध्ये दुपटीचा फरक आढळून येत असल्याचे दिसत आहे. मतदार संख्येनुसार प्रभाग संरचना करताना, १०० ते २०० मतदारांची संख्या प्रभागानुसार कमी-जास्त असू शकते. परंतु उपलब्ध मौजे वाडेगावमधील प्रभाग क्र १ ते ६ च्या उपलब्ध आकडेवारीनुसार प्रभाग संरचना ही सर्व नियमांना फाटा देऊन विशिष्ट लोकांना फायदा होण्याकरिता प्रभाग संरचना केल्याची दिसून येते. कारण सदर आकड्यांचे अवलोकन केले असता प्रभाग क्र ३ मध्ये एकूण मतदार ११३८ आहेत तर प्रभाग क्र ६ मध्ये एकूण मतदार ३५७७ आहेत सदर बाब लोकशाहीतील मतदारांच्या अधिकाराला बाधक ठरणारी आहे. लोकशाहीत आपण जात, धर्म नाकारत असलो तरी गावातील वस्ती पूर्वीपासून समूह-समूहाने वास्तव्यास आहेत. जाती, धर्म या बाबी नाकारत कोणत्याही प्रभागाची मतदार संख्येमध्ये इतर प्रभागाच्या मतदार संख्येमध्ये १०० ते २०० मतदारांपेक्षा संख्या कमी-जास्त न ठेवता नवीन मतदार संख्येनुसार संरचना करून लोकशाही बळकट करण्याकरिता मौजा वाडेगावमधील मतदारांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी रूपाली काळे यांनी केली.