अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत भेदभाव

By Admin | Published: July 4, 2014 12:26 AM2014-07-04T00:26:08+5:302014-07-04T00:43:51+5:30

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान मनपाने भेदभाव केल्याचे स्पष्टपणे दिसून आले

Differentiation in Encroachment Elimination Campaign | अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत भेदभाव

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत भेदभाव

googlenewsNext

अकोला : जुने शहरातील डाबकी रोड परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान मनपाने भेदभाव केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. परवानगी नसल्याच्या सबबीखाली चक्रनारायण यांच्या मालकीच्या जागेतील वेल्डिंग वर्क शॉप जमीनदोस्त केल्याने या भागात गुरुवारी तणावाचे निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांचा रोष पाहता, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर व इतर अधिकार्‍यांनी कारवाई अर्धवट सोडून निघून जाणे पसंत केले.
शहराला अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केला असला तरी संबंधित अधिकार्‍यांची अतिक्रमकांसोबत असलेली हातमिळवणी पारदश्री कारवाईच्या आड येत आहे. या बाबीचा प्रत्यय गुरुवारी डाबकी रोड परिसरात दिसून आला. रस्त्यापासून दूर अंतरावर असलेल्या दुकानांच्या पाट्या, पायर्‍या-ओटे तोडण्यात आले. यामध्ये मास्टर पॉवर जीम, आकांक्षा वेल्डिंग वर्क शॉप, श्रीराम टॉवर आदींचा समावेश आहे. यादरम्यान, चक्क कॅनालच्या जागेवर उभारलेल्या अतिक्रमित जकात नाक्याला मात्र अभय देण्यात आले. अर्थातच काही ठिकाणचे अतिक्रमण काढल्यानंतर काही अतिक्रमणाकडे पूर्णत: पाठ फिरवल्याचे चित्र होते. या संपूर्ण कारवाईमध्ये मनपा अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

Web Title: Differentiation in Encroachment Elimination Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.