‘डिजिटल-ऑनलाइन’ सात-बारा स्वातंत्र्यदिनापासून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:43 AM2017-08-02T02:43:31+5:302017-08-02T02:44:23+5:30
अकोला: जिल्हय़ातील शेतकर्यांना ‘डिजिटल’ स्वाक्षरीसह ‘ऑनलाइन’ सात-बारा वितरण १५ ऑगस्टपासून (स्वातंत्र्यदिन) सुरू करण्यात येणार आहे. डिजिटल ऑनलाइन सात-बारा वितरणाचा प्रारंभ पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्हय़ातील १ हजार १0 गावे असून, ३ लाख ५३ हजार ७९३ सात-बारा आहेत. जिल्हय़ातील सर्व सात-बाराचे सन २0१२ मध्ये संगणकीकृत करण्यात आले असून, ऑनलाइन करण्यात आले आहेत. संगणकीकृत करण्यात आलेल्या सात-बारामधील त्रुटीची दुरुस्ती करून सात-बारा अद्ययावत करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, १५ ऑगस्टपासून जिल्हय़ातील शेतकर्यांना डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन सात - बारा वितरित करण्यात येणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते डिजिटल ऑनलाइन सात-बारा वितरणाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच जिल्हय़ातील प्रत्येक तलाठी साजाच्या ठिकाणी किमान पाच शेतकर्यांना ऑनलाइन सात-बाराचे वितरण करण्यात येणार असल्याचेही सांगितले.
ग्रामसभांमध्ये चर्चा!
डिजिटल ऑनलाइन सात-बारासंबंधी जिल्हय़ात जनजागृती करण्यासाठी गावागावात चित्ररथ फिरणार असून, ४६ महाविद्यालयांमध्ये या विषयावर विद्यार्थ्यांच्या वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याचे आवाहन महाविद्यालयांच्या प्राचार्यांना करण्यात आले आहे. तसेच ग्रामसभांचे आयोजन करून, या विषयावर चर्चा घडवून आणण्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांना कळविण्यात आल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.