दत्त जयंतीनिमित्त दत्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:13 AM2021-01-01T04:13:35+5:302021-01-01T04:13:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुरूम : स्थानिक श्रीसंत केशवभारती महाराज संस्थान येथील ‘श्री’च्या समाधी मंदिरात दत्त जयंतीनिमित्त दत्त महाराजांच्या मूर्तीची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूम : स्थानिक श्रीसंत केशवभारती महाराज संस्थान येथील ‘श्री’च्या समाधी मंदिरात दत्त जयंतीनिमित्त दत्त महाराजांच्या मूर्तीची मंगळवार, २९ डिसेंबरला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
या वेळी जळगाव जामोद येथील रहिवासी प्रा. हृषीकेश कांडलकर व दीपाली कांडलकर यांच्या हस्ते दत्तात्रय महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अवधूत महाराज इंगळे यांच्या नेतृत्वाखाली विधिवत पूजा अर्चा व अभिषेक करून करण्यात आली.
या वेळी विविध कार्यक्रम पार पडले. तसेच यानिमित्ताने रुपरावजी बोबडे परिवारातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्रीदत्त महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा वेळी संस्थानचे अध्यक्ष देवीदास चर्जन, श्रावणजी दावेदार, श्रीरामजी कोरडे, श्रीराम बोबडे, प्रा. नानासाहेब कांडलकर, पुरुषोत्तम कोरडे, ज्ञानेश्वर निमकर यांची उपस्थिती होती.
_______
बॉक्स
मंदिराचा होणार जीर्णोद्धार
कुरूमवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीसंत केशवभारती महाराज मंदिराचा येत्या काही दिवसांत जीर्णोद्धार होणार आहे. त्याचे भूमिपूजन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पार पडले असून, लवकरच ‘श्रीं’च्या मंदिराच्या जीर्णोद्धार कामाला सुरुवात होणार आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर कुरूम गावाच्या वैभवात एक मोठी भर पडेल, अशी आशा आहे. याकरिता अंदाजे ३० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार असून, भव्यदिव्य अशा प्रकारचा ५१ फूट उंचीचा कळस (घुमट) या मंदिरावर चढविण्यात येणार आहे. नुकतीच या मंदिराच्या वतीने एका सभामंडपाची उभारणी झालेली आहे. या सर्व कामांची उभारणी लोकवर्गणीतून आणि श्रीसंत केशवभारती महाराजांच्या भाविक भक्तांच्या दातृत्वातून होत आहेत.