दिग्रस बु. परिसरात अवैध वृक्षतोड वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:24 AM2021-02-27T04:24:47+5:302021-02-27T04:24:47+5:30
राहूल सोनोने रिॲलिटी चेक वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील दिग्रस बु. शिवारात वनसंपदा धोक्यात सापडली आहे. दिग्रस बु. परिसरातील तुलंगा, सस्ती, ...
राहूल सोनोने
रिॲलिटी चेक
वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील दिग्रस बु. शिवारात वनसंपदा धोक्यात सापडली आहे. दिग्रस बु. परिसरातील तुलंगा, सस्ती, वाडेगाव शिवारात अवैध वृक्षतोडीचे प्रमााण मोठ्या प्रमाणात वाढले असून, वनविभागाचे व संबंधित अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार तरी कधी असा प्रश्न वनप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
दिग्रस बु. तुलगा ,सस्ती,लावखेड वाडेगाव तामसी आदी परिसरात लाकूड माफियांकडून भरदिवसा वृक्षतोड सुरू आहे. दरवर्षी शासनाकडून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध योजना अमलात आणल्या जातात. वृक्षलागवड व संगोपनासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जातो; मात्र दिग्रस बु. शिवारात लाकुड माफियांकडून अवैध वृक्षतोड वाढली आहे. परिसरातील सस्ती, तुलंगा आदी गावांमध्ये अवैध वृक्षतोड करून वाहने दिसून येत आहेत. आरा गिरण्यांमध्ये ट्रॅक्टर व ट्रकद्वारे लाकडांची वाहतूक होत असल्याचे चित्र आहे. वन कायद्यानुसार बंदी असलेल्या आंबा, चिंच, साग, कडूनिंब आणि वड या झाडांची तोड वाढली आहे. सकळी ५ च्या सुमारास वृक्षतोड माफिया येऊन आरा मशीन ने हिरवेगार वृक्ष तोडल्या जातात तरी सुद्धा याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्या जात नाही .या वृक्ष तोडल्या परिसरात जंगल मोकळा मोकळं वाटत आहे. मुख्य रस्त्याने अवैध वृक्षतोड होत असल्याने कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न वृक्षप्रेंमीकडून उपस्थित केला जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन लाकूड माफियांवर कारवाईची मागणी होत आहे. याबाबत बाळापूर उपसभापती धनंजय दंदळे ,वंचित युवा आघाडीचे पातूर तालुका सचिव सुमेध हातोले,वाडेगाव येथील पर्यावरण मित्र अश्विन कडांरकर यांनी संबंधित अधिकारी यांना माहिती देऊन सुद्धा कारवाई का केली जात नाही असा प्रश्न वृक्षप्रेमीकडून केल्या जात आहे.
-----------------------------------------------
ताडपत्रीने झाकून ट्रॅक्टर, मालवाहूद्वारे वाहतूक
लाकूड माफियांकडून भरदिवसा वृक्षतोड केली जात आहे. कटाई केलेल्या वृक्षांची वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर व मालवाहू ट्रकचा साहारा घेतल्या जात आहे. प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकण्यासाठी वाहनाला ताडपत्री बांधून वाहतूक केल्या जात असल्याचे परिसरात दिसून येत आहे.
----------------------
मागील अनेक दिवसांपासून परिसरात वृक्षतोड सुरू असून शासन झाड वाचवण्यासाठी करीत असलेली धडपड प्रशासनाच्या शून्य नियोजन असल्याने निरर्थक ठरत आहे.
- जगदीश चिंचोळकर पर्यावरण मित्र वाडेगाव