दिग्रस बु. परिसरात अवैध वृक्षतोड वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:18 AM2021-05-24T04:18:10+5:302021-05-24T04:18:10+5:30

कोरोना चाचणीला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पातूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पातूर शहर ...

Digras Bu. Illegal logging increased in the area! | दिग्रस बु. परिसरात अवैध वृक्षतोड वाढली!

दिग्रस बु. परिसरात अवैध वृक्षतोड वाढली!

Next

कोरोना चाचणीला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पातूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पातूर शहर व शिर्ला ग्रा. पं. क्षेत्रातील व्यापारी, व्यावसायिक, दुकानदारांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील व्यावसायिकांनी कोरोनाची चाचणी करण्यासाठी गर्दी केली होती.

मूर्तिजापूर-हिवरा कोरडे रस्त्याची दुरवस्था !

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर-हिवरा कोरडे रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. या मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगरसेवक इब्राहिम घाणीवाला यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ग्रामसेवकाला मुख्यालयी राहण्याची ॲलर्जी

निहिदा : परिसरातील शेलू बु. येथील ग्रामसेवक सतत गैरहजर राहत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. ग्रामसेवक वेळेवर न येणे, कार्यालयात उपस्थित नसल्याचे प्रकार वाढल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

आलेगाव परिक्षेत्रात सागवान जप्त

पांढुर्णा : आलेगाव वन विभागाचे कर्मचारी रात्री गस्तीवर असताना जांभ मायनर येथे अवैध सागवानाचे नऊ नग जप्त केले. ही कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक एम.एस. राठोड, दामू जाधव व वनमजूर यांनी केली.

भांबेरी येथे स्वच्छता अभियान

भांबेरी : येथे सावित्रीच्या लेकी या ग्राम संघामार्फत ग्रामपंचायत, मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. या वेळी ग्रामसंघाच्या अध्यक्ष संगीता देशमुख, कोषाध्यक्ष वर्षा इंगळे, सुरेखा देशमुख, इंदू भोजने, उषा आगरकर, नलू राऊत, चंचल पुरी, भाग्यश्री बोदडे आदी महिला उपस्थित होत्या.

रोहनखेड-कुटासा रस्त्याची दयनीय अवस्था!

रोहनखेड : गत काही वर्षांपासून रोहनखेड-कुटासा या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याकडे संंबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे

निहिदा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत, लॉकडाऊन संदर्भात आदेश जारी केले आहेत, त्याचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन बार्शिटाकळीचे तहसीलदार गजानन हामंद यांनी नागरिकांना केले आहे.

रेतीची अवैध वाहतूक जोरात

वल्लभनगर : निंभोरा परिसरात पूर्णा नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. महसूल विभागाच्या मूक संमतीने हा प्रकार सुरू असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

चान्नी परिसरातील गावांमध्ये संचारबंदीला प्रतिसाद

खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत ४४ गावांत संचारबंदीला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. ४४ गावांत नागरिकांनी पुढाकार घेत दुकाने व व्यवसाय बंद ठेवून घरात थांबून शासनाला सहकार्य करीत आहेत. ४४ गावांत संचारबंदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.

वाडेगावात आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य!

वाडेगाव : वाडेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या आठवडी बाजारासह अनेक प्रभागांमधील नाल्या तुडुंब भरल्यामुळे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Digras Bu. Illegal logging increased in the area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.