महावितरणच्या संचालक (संचालन) पदी  दिनेशचंद्र साबू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 04:16 PM2018-11-02T16:16:06+5:302018-11-02T16:17:23+5:30

अकोला:महावितरणच्या संचालक (संचालन) या पदावर दिनेशचंद्र साबू यांची नियुक्ती झाली.

Dinesh Chandra Sabu as the Director (Operations) of Mahavitaran | महावितरणच्या संचालक (संचालन) पदी  दिनेशचंद्र साबू

महावितरणच्या संचालक (संचालन) पदी  दिनेशचंद्र साबू

googlenewsNext

अकोला:महावितरणच्या संचालक (संचालन) या पदावर दिनेशचंद्र साबू यांची नियुक्ती झाली असून त्यांनीगुरूवारी दि. 1 नोव्हेंबरला पदभार स्वीकारला आहे.साबू यापूर्वी  महावितरणचे संचालक (प्रकल्प) या पदावरप्रकाशगड मुख्यालय, मुंबई येथे कार्यरत होते.

 दिनेशचंद्र साबू हे अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा येथील रहिवासी आहेत. ते 1983 मध्येतत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून रूजू झाले. त्यानंतर त्यांनी विविध पदांवरकाम केले. 2008 मध्ये त्यांची अधीक्षक अभियंता म्हणून कळवा येथील भारप्रेषण केंद्रात नियुक्ती झाली. वसईव वाशी येथेही अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीयसंचालक यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 2013 मध्ये श्री. दिनेशचंद्र साबूयांची मुंबई मुख्यालयात पायाभूत आराखडा विभागाचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनीही महत्वाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.

 दिनेशचंद्र साबू यांची कार्यकारी संचालक पदावर सरळ सेवा भरतीने बढती झाल्यानंतर केवळ आठमहिन्यात त्यांच्या उत्कृष्ट कार्यकाळाची दखल घेऊन व्यवस्थापनाने  दोन वर्षापूर्वी संचालक (प्रकल्प) यापदावर त्यांची नियुक्ती केली. श्री. साबू यांनी आपल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात एकात्मिक ऊर्जा विकासकार्यक्रम व दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. तसेच प्रधानमंत्री सहजबिजली हर घर योजना 'सौभाग्य' या योजनेच्या अंमलबजावणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. महावितरणचेअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली  साबू यांनी एलिफंटा येथील विद्युतीकरणाचे काम यशस्वीपणे पूर्ण केले. या कामाचा मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी विशेष गौरव केलाआहे.

Web Title: Dinesh Chandra Sabu as the Director (Operations) of Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.