माहिती, ज्ञान व प्रबोधनाचा दीपोत्सव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 02:06 PM2017-10-12T14:06:15+5:302017-10-12T14:20:30+5:30
दीपावली हा प्रकाशाचा उत्सव आहे, प्रकाश हे प्रगतीचे लक्षण आहे त्यामुळे या उत्सवाच्या पृष्ठभूमीवर ‘लोकमत’ ने दीपोत्सव या आगळयावेगळया दीवाळी अंकाची परंपरा सुरू केली आहे.
अकोला : दीपावली हा प्रकाशाचा उत्सव आहे, प्रकाश हे प्रगतीचे लक्षण आहे त्यामुळे या उत्सवाच्या पृष्ठभूमीवर ‘लोकमत’ ने दीपोत्सव या आगळयावेगळया दीवाळी अंकाची परंपरा सुरू केली आहे. गेल्या काही वर्षापासून मी हा अंक आवर्जून वाचत असतो, माहिती, ज्ञान व प्रबोधनासोबतच मनोरंजन अशी मेजवानी दीपोत्सव देतो याचा आनंद आहे अशा शब्दात परम महासंगणकाचे जनक पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी काढले.
डॉ.भटकर यांचे जन्मगाव असलेल्या मुर्तीजापूर तालुक्यातील मुरंबा येथे गुरूवारी सकाळी दीपोत्सवचे औपचारिक प्रकाशन त्यांच्या हस्ते पार पडले यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला.
या कार्यक्रमाला लोकमत अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले, अकोला आवृत्तीचे वितरण व्यवस्थापक प्रकाश वानखडे, मुख्य उपसंपादक राजेश शेगोकार, मुर्तीजापूरचे तालुका प्रतिनिधी दीपक अग्रवाल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ.भटकर यांनी लोकमतच्या विविध उपक्रमांचा उल्लेख करीत ‘लोकमत’ व्यक्त करणारे हे वृत्तपत्र असल्याचे सांगीतले. बदलत्या काळात माहिती व तंत्रज्ञनाचा वेग वाढत असताना वाचन संस्कृती टिकेल की नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे मात्र लोकमतने वेगवेगळे उपक्रम राबवुन वाचकांची नवी पीढी तयार केल्याचे ते म्हणाले. दीपोत्सव अंकाचे मुखपृष्ठ नव्या पीढीला जुन्या काळाची ओळख करून देणारे तर जुन्या पीढीच्या आठवणींना उजाळा देणारे असल्याचे सांगत ‘लोकमत’च्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी निवासी संपादक रवी टाले यांनी दीपोत्सव संदर्भातील भुमिका विषद केली.