मोर्णात टाकली जातेय घाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:05+5:302021-07-23T04:13:05+5:30
सोयाबीन पुन्हा आठहजारी! अकोला : यावर्षी सोयाबीनचे दरांमध्ये विक्रमी नोंद होत आहे. काही दिवसांपासून या दरात चढ-उतार होत असून ...
सोयाबीन पुन्हा आठहजारी!
अकोला : यावर्षी सोयाबीनचे दरांमध्ये विक्रमी नोंद होत आहे. काही दिवसांपासून या दरात चढ-उतार होत असून गुरुवारी पुन्हा सोयाबीनला जास्तीत जास्त ८ हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला.
अर्धवट रस्त्यामुळे हाल!
अकोला : डाबकी ते निमकर्दा या रस्त्याचे काम सुरू होऊन महिने लोटले; मात्र हे काम बंद पडल्यामुळे ऐन पावसाळ्यात वाहनचालकांचे चांगलेच हाल होत आहे. रस्त्यामध्ये पावसाच्या पाण्यामुळे चिखल झाला आहे. वाहने घसरून पडण्याचे प्रकारही समोर येत आहे.
एसटीला अडथळा नाही!
अकोला : जिल्ह्यात बुधवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे नाल्यांना पूर आला तर नदी ओसंडून वाहत होती; मात्र आगार क्रमांक २ मधून सुटणाऱ्या फेऱ्यांना कुठल्याही मार्गावर अडथळा निर्माण झाला नाही. त्यामुळे एकही फेरी रद्द करण्यात आली नसल्याची माहिती आहे.
प्रयोगशाळेत अहवाल प्रलंबित
अकोला : ऐन खरीप हंगामात निविष्ठा खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, याकरिता कृषी विभागाकडून बियाणे विक्रीची दुकाने व गोदामांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार बियाण्यांचे १२१, रासायनिक खते ६२ आणि कीटकनाशकांचे २६ नमुने तपासणीचे लक्ष्यांक कृषी विभागाला आहे. यातील काही अहवाल बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे.
तिळाचे क्षेत्र घटले!
अकोला : जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरण्या जवळपास आटोपल्या आहे. कृषी विभागाने १,११६ हेक्टरवर तीळ लागवडीचे नियोजन केले होते; परंतु आतापर्यंत केवळ १० टक्के क्षेत्रात तिळाची पेरणी झाली आहे.