दहा महिन्यानंतर सुरू होणार दिव्यांग कक्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:13 AM2021-01-01T04:13:48+5:302021-01-01T04:13:48+5:30
बुधवार, गुरुवार होणार वैद्यकीय तपासणी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर दिव्यांगांची वैद्यकीय चाचणी केली जाते. त्यानुसार, बुधवार आणि गुरुवार, ...
बुधवार, गुरुवार होणार वैद्यकीय तपासणी
दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर दिव्यांगांची वैद्यकीय चाचणी केली जाते. त्यानुसार, बुधवार आणि गुरुवार, असे आठवड्यातून दोन दिवस दिव्यांगांची येथील बाह्य रुग्ण विभागात तपासणी केली जाणार आहे.
मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांना प्राधान्य
लॉकडाऊनपूर्वी ज्यांनी प्रमापत्रासाठी ऑनलाइन अर्ज केला आहे; पण त्यांची वैद्यकीय चाचणी झाली नाही, अशा दिव्यांगांना वैद्यकीय तपासणीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. ऑनलाइन अर्ज क्रमवारीनुसार दिव्यांग कक्षामार्फत संबंधितांना मॅसेजद्वारे वेळ आणि दिवस दिला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
कोविड रुग्णांची संख्या कमी झाली असून, सर्वोपचार रुग्णालयातील ओपीडीही पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून दिव्यांग कक्ष सुरू करण्याचा निर्णय जीएमसीने घेतला आहे. प्रमाणपत्रासाठी ज्यांना ऑनलाइन अर्ज केले आहेत, अशांना क्रमवारीनुसार वैद्यकीय चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला