थेट वरिष्ठांकडे तक्रार केल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:03 PM2020-08-29T12:03:47+5:302020-08-29T12:03:54+5:30

निर्देशांचे पालन न केल्यास संबंधित कर्मचाºयाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या परिपत्रकात देण्यात आला आहे.

Disciplinary action will be taken if the complaint is made directly to the superiors! | थेट वरिष्ठांकडे तक्रार केल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई!

थेट वरिष्ठांकडे तक्रार केल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई!

googlenewsNext

- अतुल जयस्वाल
अकोला : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैयक्तिक तक्रारी किंवा निवेदन थेट मुख्यालयातील वरिष्ठ किंवा उच्चतम अधिकाºयांकडे न करता त्यांच्या नजीकच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या पूर्व परवानगीने व त्यांच्या मार्फतच करावे, असे फर्मान महापारेषण कंपनीच्या मानव संसाधन विभागाचे कार्यकारी संचालक यांच्या स्वाक्षरीने २७ आॅगस्ट रोजी काढण्यात आले. या निर्देशांचे पालन न केल्यास संबंधित कर्मचाºयाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या परिपत्रकात देण्यात आला आहे.
महापारेषणच्या सेवाविनिमयातील तरतुदीप्रमाणे एखाद्या कर्मचाºयास त्याच्या सेवाविषयक बाबींसाठी निवेदन सादर करावयाचे त्यासाठी विशिष्ट असे शिष्टाचार पाळणे गरजेचे आहे. त्यानुसार कर्मचाºयांनी त्यांच्या निकटच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या पूर्वपरवानगीने निवेदन सादर करणे अपेक्षित आहे; परंतु अनेक कर्मचारी तसे न करता थेट मुख्यालयातील वरिष्ठ किंवा उच्चतम अधिकाºयांना निवेदन सादर करतात. तसेच काही कर्मचारी थेट पारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या ई-मेल आयडीवरही अशी निवेदने किंवा तक्रारी पाठवितात. यामुळे त्या कर्मचाºयाचे निकटचे वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ राहतात तसेच मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांचा वेळ खर्ची पडत असल्याचा दावा करत, यापुढे सेवाविषयक बाबी किंवा धोरणासंबंधी निवेदन किंवा तक्रारी थेट मुख्यालयातील अधिकाºयांना पाठवू नये, अशी ताकीद परिपत्रकात देण्यात आली आहे.

सेवा पुस्तकात नोंद घेणार!
या निर्देशांचे उल्लंघन केल्यास सेवानियमानुसार बेशिस्त वर्तन केल्याचे ठरवून संबंधित कर्मचाºयावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, तसेच त्याबाबतची नोंद संबंधित कर्मचाºयाच्या सेवा पुस्तकातही करण्यात येणार आहे.

‘ईमिजिएट बॉस’बाबत तक्रार असल्यास?
एखाद्या कर्मचाºयाला त्याच्या निकटच्या वरिष्ठ अधिकाºयाबाबत (ईमिजिएट बॉस) कार्यालयीन स्वरूपाची तक्रार करावयाची असल्यास, ती त्यांच्याच मार्फत कशी करावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसे केल्यास ती तक्रार वरिष्ठांपर्यंत पोहोचण्याची शाश्वती काय, अशी दबक्या आवाजातील चर्चा पारेषणच्या कर्मचाºयांमध्ये आहे.

 

Web Title: Disciplinary action will be taken if the complaint is made directly to the superiors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला