संपकालीन कर्मचा-यांच्या वेतन कपातीवर आज चर्चा
By admin | Published: September 21, 2016 02:02 AM2016-09-21T02:02:57+5:302016-09-21T02:02:57+5:30
अकोला मनपाची बुधवारी सभा; वेतन कपातीला स्थगिती देण्यासाठी स्थायी समितीकडे अर्ज.
अकोला, दि. २0 - चौदा दिवसांच्या संप काळातील मनपा कर्मचार्यांचे वेतन कपात करण्यात यावे. या आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध अकोला महापालिका कर्मचारी-सेवानवृत्त कर्मचारी संघर्ष समितीने, स्थायी समितीकडे अर्ज केला आहे. बुधवारी होणार्या या सभेत यावर चर्चा होणार आहे.
अकोला महापालिकेचे शेकडो कर्मचारी थकित वेतनाच्या मागणीसाठी २५ जूनपासून सलग १४ दिवस बेमुदत संपावर गेले होते. महापालिकेचे कामकाज प्रभावित झाल्याच्या भूमिकेतून महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी संप काळातील कर्मचार्यांचे वेतन कपात करण्याचे आदेश २२ ऑगस्ट २0१६ रोजी दिले. त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी हादरले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५६ (४) पोटकलम (१) खंड ह्यडह्ण अन्वये स्थायी समितीकडे अर्ज करून यावर स्थगिती मिळण्यासाठी अर्ज केला आहे. कर्मचारी संघर्ष समितीचे अध्यक्ष पी.बी. भातकुले यांनी केलेल्या या अर्जावर बुधवारच्या स्थायी समितीत चर्चा होणार आहे. २0१५-१६ च्या वार्षिक लेख्याबाबत स्थायी समितीने सकाळी ११ वाजता सभा बोलाविली आहे. अकोला महापालिका कर्मचार्यांचे साडेतीन महिन्यांचे वेतन पुन्हा थकित झाले आहे. मे महिन्याच्या वेतनानंतर महापालिका प्रशासनाने वेतन दिलेले नाही. जून ते सप्टेंबर उजाळला तरी वेतनाची साधी चर्चादेखील नाही. मागील एका आंदोलनादरम्यान दत्तू वानखडे नामक कर्मचार्याने आत्महत्या केली होती. तेव्हा राज्य शासनाने तातडीने १५ कोटी मंजूर करून कर्मचार्यांचे वेतन केले होते. त्यानंतर कर्मचार्यांचे वेतन नियमित करण्याची तंबी दिली होती; मात्र महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ही विस्कटलेली घडी अजूनही नीट झाली नाही.
थकित वेतनाच्या मागण्यांसाठी अकोला महापालिका कर्मचारी संघर्ष समितीने ११ फेब्रुवारी२0१६ रोजी पत्र दिले होते. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला गेला होता. दरम्यान, १ मार्च रोजी आयुक्तांना चर्चेसाठी पाचारण केले होते. त्यांनी वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित झाले. दरम्यान, ११ फेब्रुवारीची नोटीस कायम ठेवून १९ मे रोजी पुन्हा आंदोलनाबाबत अवगत करण्यात आले. त्याचीही दखल न घेतल्याने अखेर २५ मे १६ पासून ७ जूनपर्यंंंंत कर्मचार्यांनी बेमुदत आंदोलन छेडले. त्यामुळे आमचे आंदोलन बेकायदेशीर नाही. आमच्या मागण्या अवास्तव नव्हत्या.
-विठ्ठल देवकते, सचिव, कर्म. संघ. समिती मनपा, अकोला.