राजकीय वर्तुळात टक्केवारीच्या गणितावर रंगताहेत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:50 PM2019-04-19T22:50:59+5:302019-04-19T22:55:17+5:30
- आशिष गावंडे अकोला :लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा प्रथमच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात रणशिंग फुंकले. ...
Next
- शिष गावंडेअकोला:लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा प्रथमच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात रणशिंग फुंकले. अॅड. आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अॅड. संजय धोत्रे यांच्या विरोधात आणि सोलापूर मतदारसंघातूनही निवडणूक लढवली. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या दोन्ही मतदारसंघातील लढतीकडे लागले आहे. यादरम्यान, २०१४ च्या तुलनेत यावेळी पार पडलेल्या निवडणुकीत मतदानात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये १ लक्ष ४४ हजार ४७८ नवीन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यामुळे ही वाढीव टक्केवारी नेमकी कोण्या उमेदवाराच्या पथ्यावर पडणार आणि कोण ‘बाजीगर’ ठरणार यावर जिल्हाभरात चर्चेचे फड रंगले आहेत.सतराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी राजकीय पक्षांसह निवडणूक विभागाने जनजागृती मोहीम व प्रचार-प्रसार केला. त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले. २०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा नवीन मतदारांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच मतदानाच्या टक्केवारीतही वाढ झाल्याचे दिसून आले. गतवेळी राजकीय पटलावरील वेगवान घडामोडी व मोदी लाट पाहता यावेळी मतदानाची टक्केवारी वाढणार की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. भाजप-शिवसेना महायुती, वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतरही जिल्ह्यात जाहीर सभा, दौºयांचा धडाका दिसत नसल्याचे चित्र होते. २०१४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील एकूण १६ लक्ष ६९ हजार ८६१ मतदारांपैकी ९ लक्ष ७२ हजार २८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यावेळी एकूण ५८.२२ टक्के मतदान झाले होते. यंदा १८ लक्ष ६१ हजार ७३९ मतदारांपैकी ११ लक्ष १६ हजार ७६३ मतदारांनी आपल्या अधिकाराचा वापर केला. यावेळी ६० टक्के मतदान झाले असून, गतवेळच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते. एकूणच, २०१४ मधील निवडणुकीच्या तुलनेत २०१९ मधील निवडणुकीत १ लक्ष ९१ हजार ८७८ नवीन मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून, यापैकी तब्बल १ लक्ष ४४ हजार ४७८ मतदारांनी मतांचे दान केल्याचे समोर आले आहे. ही वाढीव टक्केवारी खासदार अॅड. संजय धोत्रे, काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल तसेच वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर या तिघांपैकी नेमकी कोणाच्या वाटेला गेली, यावर चर्चेच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपचा आलेख चढताच! २००९ मधील निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खा.अॅड. संजय धोत्रे यांना २ लक्ष ८७ हजार ५२६ मते मिळाली होती. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत खा. धोत्रे यांच्या मताधिक्यात वाढ होऊन त्यांना ४ लक्ष ५६ हजार ४७२ मते मिळाली होती. यंदा मतदानाच्या टक्केवारीत झालेली वाढ पाहता खा. धोत्रे यांना किती मते मिळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ‘वंचित’च्या लढतीकडे लक्षअॅड. प्रकाश आंबेडकर यंदा दहाव्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांनी विद्यमान खासदार अॅड. संजय धोत्रे, काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांच्यासमोर आव्हान उभे केले. भाजप व वंचितने जिल्ह्यात ‘बुथ मॅनेजमेंट’च्या माध्यमातून शतप्रतिशत मतदानासाठी जोरदार प्रयत्न केल्याचे दिसून आले. मागील लोकसभेच्या मतदानाच्या तुलनेत यंदाचे मतदान२०१४- ९,७२,२८५२०१९- ११,१६,७६३ १,४४, ४७८ (वाढलेले मतदान) गेल्या निवडणुकीतील निकालपक्ष मतेभाजप ४,५६,४७२काँग्रेस २,५३,३५६भारिप-बमसं २,३८,७७६ मतदानाची टक्केवारी२००९- ४९.५४ २०१४- ५८.२२२०१९- ५९.९८