लोहार्‍याजवळ अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थीनीचा उपचारादरम्यान मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 06:54 PM2017-11-30T18:54:28+5:302017-11-30T19:04:16+5:30

प्रवाशी वाहनाचा लोहारानजीक अपघात होउन तळेगाव बाजार येथील शिवानी पांडे ही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना २0 नोव्हेंबर रोजी  घडली. या विद्यार्थीनीचा नागपूर येथे उपचारादरम्यान ३0 नोव्हेंबर रोजी मृत्यू  झाला. शिवाणी तिच्या अपंग आईचा आधार होता.तिच्या मृत्यूने हा आधारही  नियतीने हिरावला आहे. 

Disease during the treatment of the injured students in the accident! | लोहार्‍याजवळ अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थीनीचा उपचारादरम्यान मृत्यू!

लोहार्‍याजवळ अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थीनीचा उपचारादरम्यान मृत्यू!

googlenewsNext
ठळक मुद्देअपंग मातेचा आधार हरवला२0 नोव्हेंबर रोजी लोहार्‍याजवळ घडला होता अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : प्रवाशी वाहनाचा लोहारानजीक अपघात होउन तळेगाव बाजार येथील शिवानी पांडे ही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना २0 नोव्हेंबर रोजी  घडली. या विद्यार्थीनीचा नागपूर येथे उपचारादरम्यान ३0 नोव्हेंबर रोजी मृत्यू  झाला. शिवाणी तिच्या अपंग आईचा आधार होता.तिच्या मृत्यूने हा आधारही  नियतीने हिरावला आहे. 
तळेगाव बाजार येथील चोपडे कुटुंब २0 नोव्हेंबरला परी चोपडे हिचा  वाढदिवस साजरा करण्यासाठी शेगाव येथे गेले होते.  तेथून परत येताना  शेगाव-लोहारादरम्यान त्यांच्या गाडीचा अपघात होऊन नऊ जण गंभीर जखमी  झाले होते. त्यात राजीव गांधी विद्यालयात वर्ग नऊ मध्ये शिकणारी शिवानी पांडे (रा. शेगाव) ही मुलगी गंभीर होती. या अपघातात तिचा एक डोळा निकामी  झाला होता. तिच्यावर नागपूर येथील मेडिकल कॉलेज येथे उपचार चालू अस ताना तिचा  ३0 नोव्हेंबरला सकाळी मृत्यू झाला. शिवाणी एका हाताने अपंग  असूनही आपल्या आईची देखभाल करीत होती. शिवानीच्या मृत्यूने तिच्या अपंग आईचा आधारही हिरावला गेला आहे. तिच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त  होत आहे. तिच्या मृत्यूची बातमी कळताच राजीव गांधी विद्यालयात तिला श्रद्धांजली वाहण्यात आली. 

Web Title: Disease during the treatment of the injured students in the accident!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.