खरीप पिकांवर कीड, रोगराईचा धोका;  पाऊस, ढगाळ वातावरणाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 02:09 PM2018-09-01T14:09:30+5:302018-09-01T14:12:26+5:30

अकोला: विदर्भात अधून-मधून पाऊस व सतत ढगाळ वातावरण असल्याने खरीप पिकांवर विविध कीड, रोगांचा धोका वाढला आहे. कपाशीवर रसशोषण करणारी कीड तर सोयाबीनला बुरशीजन्य रोगाने ग्रासले आहे.

disease risk on crop; Rain, cloudy weather results | खरीप पिकांवर कीड, रोगराईचा धोका;  पाऊस, ढगाळ वातावरणाचा परिणाम

खरीप पिकांवर कीड, रोगराईचा धोका;  पाऊस, ढगाळ वातावरणाचा परिणाम

Next
ठळक मुद्देकापूस, सोयाबीन पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या काही भागात बोंडअळीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर हे नवे आव्हान उभे ठाकले आहे.या वातावरणामुळे रस शोषण किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तसेच विविध रोगराई वाढण्याची शक्यता आहे.


अकोला: विदर्भात अधून-मधून पाऊस व सतत ढगाळ वातावरण असल्याने खरीप पिकांवर विविध कीड, रोगांचा धोका वाढला आहे. कपाशीवर रसशोषण करणारी कीड तर सोयाबीनला बुरशीजन्य रोगाने ग्रासले आहे.
विदर्भात कापूस, सोयाबीन व धान प्रमुख पीक आहे. पावसाळी वातावरण आणि सतत ढगाळ वातावरणामुळे कापूस, सोयाबीन पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या काही भागात बोंडअळीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर हे नवे आव्हान उभे ठाकले आहे. आॅगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाला असून, अधून-मधून पाऊस सुरू च आहे. गत आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरण पिकांना अपायकारक असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कपाशीवर अगोदरच बोंडअळीने आक्रमण केले आहे. आता या वातावरणामुळे रस शोषण किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तसेच विविध रोगराई वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भ, मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून, सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत; परंतु सध्या सोयाबीनच्या खोडामध्ये कीड आढळली. परिणामी, सोयाबीन शेंगांना अन्नद्रव्याचा पुरवठा होत नसून, पूर्ण सूर्यप्रकाश मिळत नसल्याने सोयाबीन शेंगांचे दाणे भरण्यास अडचणी येत आहेत. शेंगा चापट व अपरिपक्व असल्याचे दिसत आहे. हे शेतकºयांपुढे एक नवे संकट निर्माण झाले आहे.
- बोंडअळीने शेतकरी त्रस्त
यावर्षी अनेक उपाययोजना करू नही बोंडअळीने तोंड वर काढले असून, या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकºयांचा खर्च वाढला आहे. अनेक ठिकाणी शेतकºयांनी विविध पर्याय करू न बघितले; पण अळी जुमानायला तयार नसल्याने अगोदरच शेतकरी हवालदिल झाला असताना आता नव्या कीड, रोगाच्या संकटाने तोंड वर काढले.
- सतत पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर रस शोषण करणाºया किडींसह सोयाबीनवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. अशावेळी दोन टक्के युरियाची फवारणी करावी, तसेच बुरशीनाशकांचा वापर करावा; पण उत्पादन खर्च वाढणार नाही, याची काळजी घ्यावी.
डॉ. मोहन खाकरे,
कृषी विद्यावेत्ता,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

Web Title: disease risk on crop; Rain, cloudy weather results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.