तंटामुक्त गावांतील तंटे पोहोचले पोलीस ठाण्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:23 AM2021-08-12T04:23:31+5:302021-08-12T04:23:31+5:30

अकोला: गावागावात छोट्या-मोठ्या वादानंतर उद्भवणारे तंटे गाव पातळीवर मिटविण्यासाठी तंटामुक्ती समितीची स्थापना करण्यात आली. मात्र ही मोहीम थंड पडल्याचे ...

Disputes in dispute-free villages reach police station! | तंटामुक्त गावांतील तंटे पोहोचले पोलीस ठाण्यात!

तंटामुक्त गावांतील तंटे पोहोचले पोलीस ठाण्यात!

Next

अकोला: गावागावात छोट्या-मोठ्या वादानंतर उद्भवणारे तंटे गाव पातळीवर मिटविण्यासाठी तंटामुक्ती समितीची स्थापना करण्यात आली. मात्र ही मोहीम थंड पडल्याचे चित्र आहे. ह्या समित्या केवळ कागदोपत्रीच शिल्लक उरल्या आहे. गावात मिटणारे तंटे हे थेट पोलीस ठाण्यात पोहोचत असल्यामुळे पोलीस प्रशासनावरही ताण पडत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

तंटामुक्ती अभियान राज्यभर सुरू केले होते. या समितीमार्फत गावातील होणारे तंटे हे गावपातळीवर मिटविल्या जात होते. तसेच गाव पातळीवर एकोपा निर्माण होऊन जातीय सलोखा कायम राहत होता. यासाठी ग्राम पातळीवर तंटामुक्ती समित्या गठित करून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांची निवड केली जात होती. एवढेच नव्हे तर या अनेक गावांना चांगल्या कामगिरीतून लाखो रुपयांची पारितोषिके मिळाली आहेत. सद्यस्थितीत मात्र हे अभियान थंड बस्त्यात पडल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी समित्या गठित केल्या, तर काही ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समित्या गठित करणे राहिले आहे. परिणामी, गावात मिटणारे तंटे हे पोलीस स्टेशनमध्ये जात असल्याने पोलीस प्रशासनावर ताण वाढला आहे.

------------------

नजर आकडेवारीवर

बाळापूर -

पातूर - ५२

गुन्हे - ७५४

तेल्हारा- २८

३७५

अकोट-

बार्शीटाकळी- ७३

३७५

मूर्तिजापूर-

---------------------------

चान्नी : स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत तंटामुक्ती समिती हे नावालाच राहिली आहे. पोलीस स्टेशनअंतर्गत ३० समित्या गठित केल्या असून, अंदाजे २७५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

----------------

पिंजर : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तंटामुक्ती समित्या ह्या कागदावरच असल्याच्या दिसून येत आहेत. गावात निर्माण होणारे तंटे हे थेट पोलीस ठाण्यात पोहोचत असून, पोलीस प्रशासनावर ताण येत आहे.

--------------

Web Title: Disputes in dispute-free villages reach police station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.