पती-पत्नीमध्ये संशयावरून वाद; ग्रामीण भागात तक्रारी जास्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:26 AM2021-06-16T04:26:02+5:302021-06-16T04:26:02+5:30

हुंडा न दिल्याच्या कारणावरून आजही हाेताे छळ अकोला : वर्षानुवर्षांपासून महिलांचा छळ हाेत असल्याचे आपण ऐकत आहे. अकोला जिल्ह्यातही ...

Disputes over suspicion between spouses; More complaints in rural areas! | पती-पत्नीमध्ये संशयावरून वाद; ग्रामीण भागात तक्रारी जास्त !

पती-पत्नीमध्ये संशयावरून वाद; ग्रामीण भागात तक्रारी जास्त !

Next

हुंडा न दिल्याच्या कारणावरून आजही हाेताे छळ

अकोला : वर्षानुवर्षांपासून महिलांचा छळ हाेत असल्याचे आपण ऐकत आहे. अकोला जिल्ह्यातही महिलांच्या छळाचे प्रमाण पाहिले असता, हे प्रमाण ग्रामीण भागात अधिक असल्याचे वास्तव आहे. पती व पत्नीमध्ये मोबाइलवर दुसऱ्याशी बोलण्याच्या कारणावरून वाढत असलेला संशय या वादाचे मुख्य कारण आहे. तर काहींचा सासू-सुनेचे पटत नसल्याने, माहेरवरून पैसे न आणल्याच्या कारणावरून छळाच्या घटना जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात आहेत.

जिल्ह्यात २०२१ च्या तुलनेत २०२० मध्ये महिलांचा छळ कलम ४९८ अंतर्गत माेठ्या प्रमाणात घडल्याची नाेंद पाेलीस दप्तरी दिसून येत आहे. यातही ग्रामीण भागात याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. २०२० मध्ये कलम ४९८ अंतर्गत ३१५, तर २०२१ मध्ये मे महिन्यापर्यंत १२६ प्रकरणाची नाेंद आहे. दाेन्ही वर्षांत ग्रामीण भागात प्रमाण जास्त आहे.

काय म्हणतात महिला...

वर्षानुवर्षांपासून महिलांवर अत्याचार हाेत असल्याचे आपण ऐकताे; परंतु जग बदलत चालले आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस कमी हाेत असल्याचे दिसून येते. समाजात हुंडाबळी, महिलांचा छळ यावर अनेकांकडून जनजागृती करण्यात येत आहे. पुरुषांनी महिलांना व महिलांनी पुरुषांना समजून घेणे गरजेचे आहे.

- डॉ आशा मिरगे

समाजसेविका

घरगुती भांडणावरून महिलांना मारहाण झाली म्हणून अनेक महिला माझ्याकडे येतात. मारहाण, भांडण कधी-कधी तर अतिशय किरकाेळ कारणावरून असते. दाेघांनाही बाेलावून त्यांची समजूत काढून पाठवून दिल्या जाते. यापुढे असा प्रकार घडणार नाही, याची हमी त्यांच्याकडून घेतल्या जाते.

- सुनीता अग्रवाल, समाजसेविका,

२०२० मध्ये जिल्ह्यात कलम ४९८

अंतर्गत दाखल गुन्हे ३३५

ग्रामीण भागात किती १९५

शहरी भागात किती १४०

२०२१ मध्ये झालेल्या तक्रारी

एकूण १२६

ग्रामीण ६४

शहरी ६२

Web Title: Disputes over suspicion between spouses; More complaints in rural areas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.