गावांत विनापरवानगी गर्दी झाल्यास सरपंचांवर अपात्रतेची कारवाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:19 AM2021-05-11T04:19:53+5:302021-05-11T04:19:53+5:30
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, गावात विना परवानगी जमाव किंवा परवानगीपेक्षा जास्त गर्दी ...
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, गावात विना परवानगी जमाव किंवा परवानगीपेक्षा जास्त गर्दी झाल्याचे आढळून आल्यास संबंधित सरपंचांवर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार असून, तलाठी व ग्रामसेवकांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) डाॅ. नीलेश अपार यांनी अकोला तालुक्यातील सरपंचांसह तलाठी व ग्रामसेवकांना नोटीस बजावल्या.
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्ह्यात ९ मे रोजी रात्री १२ वाजतापासून १५ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी विना परवानगी लग्न समारंभ किंवा अन्य कार्यक्रमांसाठी गावात जमाव झाल्यास किंवा परवानगीपेक्षा जास्त नागरिकांची गर्दी झाल्याचे आढळून आल्यास संबंधित गावाच्या सरपंचांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे. तसेच संबंधित तलाठी व ग्रामसेवकांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी १० मे रोजी अकोला तालुक्यातील सर्व सरपंच आणि तलाठी व ग्रामसेवकांना नोटीस बजावल्या आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी गावात विना परवानगी जमाव झाल्यास तसेच परवानगीपेक्षा नागरिकांची जास्त गर्दी झाल्याचे आढळून आल्यास संबंधित सरपंचांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे. तसेच संबंधित तलाठी व ग्रामसेवकांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असून, यासंदर्भात अकोला तालुक्यातील सर्व सरपंच, तलाठी व ग्रामसेवकांना नोटीस बजावण्यात आल्या.
डाॅ. नीलेश अपार
उपविभागीय अधिकारी, अकोला.