महान जलशुद्धीकरण केंद्राची वीज खंडित
By admin | Published: June 10, 2017 02:31 AM2017-06-10T02:31:27+5:302017-06-10T02:31:27+5:30
पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोलमडले!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहराला पाणीपुरवठा करणार्या महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा मागील तीन दिवसांपासून वारंवार खंडित होत आहे. शुक्रवारी वीज पुरवठा खंडित झाल्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठय़ावर झाला असून, जलप्रदाय विभागाचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.
महावितरण कंपनीच्यावतीने महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर विद्युत पुरवठा केला जातो. मागील तीन दिवसांपासून बाश्रीटाकळी तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाल्याचा परिणाम तब्बल ११0 पेक्षा अधिक गावांवर झाला. यासोबतच जलशुद्धीकरण केंद्राचाही पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रावरील पाण्याचा उपसा बंद पडला आहे. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक कोलमडले असून, शनिवारी पाणीपुरवठा सुरळीत होतो किंवा नाही, याबद्दल खुद्द मनपाचा जलप्रदाय विभाग साशंक असल्याची परिस्थिती आहे.