अकोला परिमंडळातील ४५६३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 06:35 PM2019-02-19T18:35:25+5:302019-02-19T18:35:29+5:30

अकोला : वारंवार पाठपुरावा करुनही वीजबिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या महावितरणच्या अकोला परिमंडळातील तब्बल ४५६३ ग्राहकांचा वीजपुरवठा फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत खंडित करण्यात आला आहे.

 Disrupting power supply of 4563 pending customers in Akola area | अकोला परिमंडळातील ४५६३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

अकोला परिमंडळातील ४५६३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

googlenewsNext

अकोला : वारंवार पाठपुरावा करुनही वीजबिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या महावितरणच्याअकोला परिमंडळातील तब्बल ४५६३ ग्राहकांचा वीजपुरवठा फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत खंडित करण्यात आला आहे.
महावितरणच्या अकोला परिंमंडळात १ फेब्रुवारी २०१९ रोजी देय मुदतीत वीज बिलांचा भरणा न केल्याने थकबाकीत असलेल्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल ४९ हजार २५९ वीज ग्राहकांकडे सुमारे ३६ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी होती. यापैकी बहुतांश ग्राहकांनी दोन महिन्यांपासून त्यांच्या वीजबिलांचा भरणा केलेला नाही, महावितरणने सप्टेबर महिन्यापासून संपुर्ण राज्यभर सुरु केलेल्या केंद्रीकृत बिलींग प्रणालीमुळे बिलींगची संपुर्ण प्रक्रीया महावितरणच्या सांघिक कार्यालयामार्फ़त राबविण्यात येत असल्याने थकबाकीदार ग्राहकांवरही सांघिक कार्यालयाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. थकबाकीचा वाढता बोझा लक्षात घेता महावितरणला आपला आर्थिक गाढा खेचणे तारेवरची कसरत ठरत आहे. ही वसूली करण्यासाठी नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या संपुर्ण विदर्भात थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहीमेत,आतापर्यंत अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमधील ४५६३ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये १७२६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात आणि २८३७ थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे.


एक हजारावरील थकबाकीदार ‘रडार’वर
पाच हजारावरील आणि एक हजारावरील थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास प्राधान्य देत महावितरणने या मोहीमेची अंमलबजावणी अधिक आक्रमकपणे सुरु केली आहे. ग्राहकांनी देय मुदतीच्या आत नियमितपणे वीजबिलांचा भरणा करीत सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

 

Web Title:  Disrupting power supply of 4563 pending customers in Akola area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.