अकोला जिल्ह्यातील १२८ थकबाकीदार पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित
By atul.jaiswal | Published: February 15, 2018 05:50 PM2018-02-15T17:50:52+5:302018-02-15T17:56:58+5:30
अकोला : महावितरणने वीजदेयक न भरणाºया जिल्ह्यातील १२८ पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे.
अकोला : महावितरणने वीजदेयक न भरणाºया जिल्ह्यातील १२८ पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. या योजनांकडे तब्बल ६४ लाख ६ हजार रुपयांची थकबाकी असल्यामुळे महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली असून त्यांतर्गत अकोला मंडळातील पाणीपुरवठा वर्गवारीतील एकूण ६६३ ग्राहकांकडे वीज देयकाचे ८ कोटी ६ लाख ९२ हजार रुपये एवढी थकबाकी प्रलंबित आहे. त्यापैकी १२८ पाणीपुरवठा योजनांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून यापैकी ५८ पाणीपुरवठा योजनांचा फेब्रुवारी महिन्यामध्ये खंडित करण्यात आला आहे. ग्राहकांनी थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
अकोला जिल्ह्यातील एकून १२८ पाणीपुरवठा योजनांचा खंडित करण्यात आला. यामध्ये एकट्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ५८ पाणीपुरवठा योजनांचा करण्यात आला.वीजपुरवठा खंडीत करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांमध्ये उपविभागनिहाय अकोट १०, तेल्हारा १०, अकोला ७, बाळापुर १२, बार्शिटाकली २, मुर्तीजापूूर ७ आणि पातुर १० योजनांचा सामावेश आहे. या योजनांकडे एकून ६४ लाख ६ हजार रुपये एवढी थकबाकी प्रलंबित होती. महावितरणने सर्वच वर्गवारीच्या थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली असून नियमानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागू शकते. थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा वेळेत करून सहकार्य करण्याचे आवाहन अकोला परीमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांनी केले आहे.