वीज तारा तुटल्याने वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:15 AM2021-05-29T04:15:53+5:302021-05-29T04:15:53+5:30
वाडेगाव : येथील पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या चान्नी फाटा-वाडेगाव रस्त्यावरील स्थानिक पेट्रोलपंपानजीक रस्त्यावर माती, मुरूम टाकणाऱ्या ट्रकमुळे ११ ...
वाडेगाव : येथील पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या चान्नी फाटा-वाडेगाव रस्त्यावरील स्थानिक पेट्रोलपंपानजीक रस्त्यावर माती, मुरूम टाकणाऱ्या ट्रकमुळे ११ केव्ही जाणाऱ्या वीज तारा तुटल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
पातूर-बाळापूर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. यामध्ये काम करीत असलेल्या ट्रकची ये-जा सुरू असते. मुरूम टाकत असताना ट्रकचा विद्युत ताराला स्पर्श झाल्याने वीज तारा तुटल्या. या अपघातात तीन ते चार खांब वाकले असून, तारासुद्धा तुटल्या होत्या. या प्रकाराकडे स्थानिक विद्युत कर्मचारी घटनास्थळी पोहोचून पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, या मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, या अपघातात जीवितहानी झाली नाही.