‘ई-डिस्ट्रिक्ट’ अंतर्गत राज्यात १६ लाख प्रमाणपत्रांचे वितरण

By admin | Published: July 3, 2015 11:19 PM2015-07-03T23:19:49+5:302015-07-03T23:19:49+5:30

ई-डिस्ट्रिक्ट प्रकल्पांतर्गत राज्यात आजवर १६ लाखांहून जास्त कागदपत्रांचे वितरण; यवतमाळ जिल्हा आघाडीवर.

Distribution of 16 lakh certificates in the State under 'e-District' | ‘ई-डिस्ट्रिक्ट’ अंतर्गत राज्यात १६ लाख प्रमाणपत्रांचे वितरण

‘ई-डिस्ट्रिक्ट’ अंतर्गत राज्यात १६ लाख प्रमाणपत्रांचे वितरण

Next

दादाराव गायकवाड/ कारंजा लाड (वाशिम): जनतेशी निगडित सर्व सेवांचे संगणकीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या ई-डिस्ट्रिक्ट प्रकल्पांतर्गत राज्यात आजवर १६ लाखांहून जास्त कागदपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. या योजनेत राज्यात यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. ई-डिस्ट्रिक्ट प्रकल्पांतर्गत नागरिकांना १६ प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने ई-सेवा केंद्रामार्फत देण्यात येतात. यामध्ये उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, विविध प्रकारचे प्रतिज्ञालेख, महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे प्रदान केली जात आहेत. केंद्रचालक नागरिकाला आवश्यक असणार्‍या सेवेचा अर्ज ऑनलाईन भरून देतो आणि नागरिक आवश्यक त्या सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय प्राप्त करू शकतात. ७/१२ चा उतारा, रहिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र अशी अनेक उपयुक्त कागदपत्रे या महा-ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिक प्राप्त करीत आहेत. यासाठी त्यांना लांबच लांब रांगा लावायची गरज नाही आणि प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कार्यालयात फेर्‍याही माराव्या लागत नाहीत. ही संपूर्ण प्रक्रिया वेळेची बचत करणारी आहे. केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पांतर्गत राज्यात आजवर १६ लाख ९0 हजार ३0४ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहेत. यामध्ये अमरावती विभागातील यवतमाळ जिल्हा आघाडीवर असून, या जिल्हय़ात ई-डिस्ट्रिक्ट प्रकल्पांतर्गत ३ लाख ३१ हजार ६९५ प्रमाणपत्रांचे ऑनलाईन पद्धतीने वितरण करण्यात आले. अमरावती विभागातील वाशिम जिल्हा यात राज्यातुन ९ व्या, तर विभागातून दुसर्‍या स्थानी आहे. वाशिम जिल्हय़ात या प्रकल्पांतर्गत आजवर ५७ हजार ९0४ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. राज्यात सर्वात कमी ७९0 प्रमाणपत्रे मुंबई शहरातून वितरित करण्यात आली.

Web Title: Distribution of 16 lakh certificates in the State under 'e-District'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.