महिला बचत गटांना ४४ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वाटप वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:21 AM2021-08-23T04:21:31+5:302021-08-23T04:21:31+5:30
बाळापूर : नगर परिषद अंतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत १७ महिला बचत गटांना ४४ लक्ष रुपयांच्या ...
बाळापूर : नगर परिषद अंतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत १७ महिला बचत गटांना ४४ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वाटप व ग्रंथालयाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शनिवार, दि. २१ ऑगस्ट रोजी झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याच्या महिला बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, प्रमुख अतिथी आमदार नितीन देशमुख, माजी मंत्री अनिस अहेमद, माजी आ. एस. एन. खतीब होते. कार्यक्रमाचे संचालन नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी प्रदीप चोरे यांनी, तर प्रास्तविक माजी आ. एस. एन. खतीब यानी केले. बाळापूर नगर परिषदेंतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत १७ महिला बचत गटांतील पाच गटांना प्रत्येकी चार लाखाचे तर १२ गटांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे कर्ज मंजुरी पत्र महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ४४ लक्ष रुपयांचे कर्ज सेंट्रल बँक बाळापुरच्या वतीने मंजूर करण्यात आले. याप्रसंगी माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमास उपविभागीय महसूल अधिकारी डाॅ. रामेश्वर पुरी, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय आव्हाडे, तहसीलदार डी. एल. मुकुंदे, नगराध्यक्ष सै. ऐनोदिन खतीब, न.प.चे मुख्यधिकारी जी. एस.पवार, नगरसेवक, काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी सेंट्रल बँकचे एलडीएम आलोक तरणीया यांचा महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सत्कार केला.